ETV Bharat / state

Eknath Shinde on Farmers Help : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रसंगी निकष डावलून मदत - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी मदत

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार बांधिल असून जास्तीत जास्त मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. अजित पवार यांनी यासंदर्भात सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.

Eknath Shinde on Farmers Help
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी मदत
author img

By

Published : Mar 17, 2023, 12:47 PM IST

मुंबई: अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांसदर्भात महत्त्वाची बातमी आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नांदेडसह मराठवाड्याच्या इतर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे मदतीचे धोरण स्पष्ट केले आहे.

आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- राज्यातील मराठवाड्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतांमध्ये गारांचा खच पडला आहे. राज्य सरकारने या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळीने झोडपलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात स्वतः जिल्हाधिकारी जाऊन पंचनामे करत आहेत. नांदेडमधील अर्धापूर येथे जिल्हाधिकारी प्रत्यक्ष गेलेले आहेत. सर्वत्र पंचनामे सुरू आहेत. पंचनामे यांचा अहवाल येताच सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल. कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

एनडीआरएफची वाट न पाहता मदत - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की राज्य सरकारने नेहमीच शेतकऱ्यांना मदत केली आहे. गेल्या आठ नऊ महिन्यांमध्ये दुष्काळग्रस्त किंवा अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात मदत करण्याची तरतूद नव्हती. ती सुद्धा तरतूद सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीचे निकष एनडीआरएफने बदलण्याची गरज आहे. मात्र त्याची वाट न पाहता राज्य सरकारने एसडीआरएफचा निकषांमध्ये बदल केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जात आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्यात ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरव क्षेत्रावरील शेतीचे नुकसान : राज्यात यापूर्वीच नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, जालना, पालघर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात हातातोडांशी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कांद्याबरोबर भाजीपाला आणि द्राक्ष, डाळिंब,पपई, केळी, आंबा या फळबागानांही मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांपुढे कसे जगावे हा प्रश्न आहे. ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर हा आकडा अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आढावे व पंचनामे केल्यानंतर याच्यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे. सरकारकडून कधी मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.