मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,( Union Home Minister Amit Shah ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांची रात्री गुप्त भेट ( Amit Shah, Chief Minister secret met ) झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर ( Eknath Shinde on Delhi tour ) आहेत. बुधवार, गुरुवार असा त्यांचा दोन दिवसात दिल्ली दौरा आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट ( Eknath Shinde met Amit Shah ) घेतली. या भेटीत जवळपास दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ठाकरेंचे अमित शाहांना अव्हान - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्याच्या दरम्यान गटप्रमुखांची, शिवसैनिकांची संवाद साधताना कोंद्रिय गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धडाडून टीका केली. आपल्या भाषणातून त्यांनी अमित शहा यांना मुंबई महानगरपालिका निवडणुका घेण्याचे खुले आव्हान केले. हिम्मत असेल तर पुढच्या महिन्यात महापालिका निवडणुका घेऊन दाखवा.
मुख्यमंत्र्यांची तोंड उघडण्याची हिम्मत नाही - महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल असा आव्हान आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिलं होत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ दिल्ली वाऱ्या करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समोर तोंड उघडण्याची देखील मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही अशी टीका आपल्या भाषणातून केली. त्यानंतर झालेल्या अमित शहा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.