ETV Bharat / state

Protest Against Rahul Gandhi: शिवाजी पार्क परिसरात शिंदे गटाचे राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं - Freedom fighter Savarkar

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे (Rahul Gandhi On Savarkar) पडसाद सावरकरांच्या मुंबईत उमटले आहेत. शिवाजी पार्क परिसरात एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. रास्ता रोको करत, राहुल गांधींचा पुतळा (Protest Against Rahul Gandhi) जाळण्याचा प्रयत्न केला. वीर सावरकरांविरोधात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला.

Protest Against Rahul Gandhi
शिवाजी पार्क परिसरात शिंदे गटाचे राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं
author img

By

Published : Nov 19, 2022, 2:06 PM IST

Updated : Nov 19, 2022, 4:08 PM IST

मुंबई: मुंबईत शिवाजी पार्क परिसरात एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. रास्ता रोको करत, राहुल गांधींचा पुतळा (Protest Against Rahul Gandhi) जाळण्याचा प्रयत्न केला. वीर सावरकरांविरोधात (Rahul Gandhi On Savarkar) राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला. राज्यभरात राहुल यांच्या विरोधात मोर्चे निघत असतानाचं त्यांच्या समर्थनार्थ देखील मोठ्या संख्येने लोक उभे राहत आहेत.

शिवाजी पार्क परिसरात शिंदे गटाचे राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं

काय म्हणाले होते राहुल गांधी? भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर (Freedom fighter Savarkar) यांच्यावर राहुल गांधींनी टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक सावरकर आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले.

सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची. ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले. यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. पण त्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत सावरकरांच्या पत्राचे पुरावे सादर करत राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासह सावरकरांच्या जन्मभूमीत तीव्र पडसाद उमटले आहे.

Last Updated : Nov 19, 2022, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.