ETV Bharat / state

गेल्या वेळेपेक्षा जास्त सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde to attend World Economic Forum : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवार (16 जानेवारी) रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार आहेत. या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते 'नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

CM Eknath Shinde to attend World Economic Forum :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ANI

Published : Jan 16, 2024, 7:27 AM IST

Updated : Jan 16, 2024, 9:37 AM IST

मुंबई : CM Eknath Shinde to attend World Economic Forum : दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ उपस्थित असणार आहे. एमएमआरडीए व महाप्रित येथील 8 अधिकारी स्वतंत्ररित्या सहभागी होत आहे. या दौऱ्याकरिता केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौऱ्यामध्ये खासगी विमानाचा वापर होणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचं शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी या परिषदेत 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हिलियन) उभारण्यात आलं आहे. याठिकाणी मुख्यमंत्री हे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. तसंच, मुख्यमंत्री प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशीदेखील चर्चा करणार आहेत. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनवण्यात आले आहेत. तसंच, महाराष्ट्राच्या घोडदौडीविषयी माहिती देणारे दृकश्राव्य प्रदर्शनही येथे करण्यात आलय.

महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग आणि शोकेस करण्याची संधी मिळणार असल्यानं ही मोठी संधी आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करू, अशी आशा आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन : आज 16 जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ओमानचे उद्योग मंत्री, सौदीचे वित्त मंत्री, दक्षिण आफ्रिकेचे उर्जा मंत्री, दक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर तसेच डीपी वर्ल्ड ( DP World), लुईस ड्रेफस (Louis Dreyfus ) वित्कोविझ एटोमिका (Witkowitz Atomica), या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे चर्चा करणार आहेत. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्य देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या दिवशी संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी व मान्यवरांना महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन आयोजित केले आहे. दरम्यान, 17 तारखेस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये 'नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास' या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. याशिवाय ‘कृषी, महिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रातदेखील ते सहभागी होणार आहेत.

  • #WATCH | Mumbai | Maharashtra Minister Uday Samant says, "...Under the leadership of CM Eknath Shinde, we are departing for the World Economic Forum at Davos. I can assure you that Maharashtra will be getting the highest investment & historical MOUs will be signed. CM Shinde, Dy… pic.twitter.com/KJ9eYAR5uX

    — ANI (@ANI) January 15, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सीआयआय गोलमेज परिषद : मुख्यमंत्री मिशेल एडब्ल्यूएस, लिकस्टनस्टाईनचे राजकुमार, हिताची कंपनीचे एमडी, कार्ल्सबर्ग ग्रुप, दस्सो सिस्टिम्स, व्होल्व्हो कार्सच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठकीत सहभागी होतील. स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चा देखील होणार असून, यात 8 कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, माध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह , उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर, 18 तारखेला सीआयआयने गोलमेज परिषद आयोजित केली असून, त्याला केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. कॅपजेमिनी, एपी मोलेर मर्स्क, बॉल कॉर्पोरेशन, यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येणार आहे.

  • #WATCH | On the World Economic Forum at Davos, Maharashtra CM Eknath Shinde says, "This is a big chance for Maharashtra that it will get a chance for branding and showcasing at the international level...This is a big opportunity for Maharashtra. We have hopes that we sign more… pic.twitter.com/6YVBoPu469

तीन लाख दहा हजार कोटींचे करार होणार : सुमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू शकते. पोलाद, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजन, हिरे व आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषी- औद्योगिक, कृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार 20 सामंजस्य करार केले जातील. यामध्ये निपॉन आर सेलर मित्तल, इंडिया ज्वेलरी पार्क, कंट्रोल एस, आयनॉक्स, ए बी ब्रिव्हरी, जिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग मुंबई, पुणे यासह छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड या जिल्ह्यातही येतील.

हेही वाचा :

1 धारावीकरांना मिळणार साडेतीनशे चौरस फुटांची घरं; स्वतंत्र शौचालय आणि स्वयंपाकघर असणार

2 दावोस परिषदेसाठी 34 कोटींची तरतूद, करोडोंमध्ये गुंतवणूकीचा मुख्यमंत्र्यांचा दावा

3 फ्लाइटला उशीर झाल्यास प्रवाशांना 'व्हॉट्सअ‍ॅप'वर मिळणार अपडेट, इंडिगोतील घटनेनंतर DGCA ने जारी केली SOP

Last Updated : Jan 16, 2024, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.