ETV Bharat / state

एकनाथ खडसेंना भाजपची दारे बंद..? फडणवीस विरोध पडला महागात - राष्ट्रीय कार्यकारिणी एकनाथ खडसे

मागील काही वर्षांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणी डावलण्यात आले आहे. त्यांना कार्यकारिणीत संधी मिळेल, असे बोलले जात होते. यातही डावलले गेल्याने यापुढे भाजपचे दरवाजे हे खडसे यांच्यासाठी बंद झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजप
भाजप
author img

By

Published : Sep 26, 2020, 10:52 PM IST

मुंबई - भाजपने आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून यात विधानसभा निवडणुकीत दूर ठेवण्यात आलेल्यांनाही संधी देण्यात आली. दुसरीकडे मागील काही वर्षांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र डावलण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळेल, असे बोलले जात होते. यातही डावलले गेल्याने यापुढे भाजपचे दरवाजे हे खडसे यांच्यासाठी बंद झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या नवीन कार्यकारिणीत विधानसभा निवडणुकीत तिकीटही नाकारण्यात आलेले व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, तर या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, राम शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. हे तीनही नेते तरुण असल्याने त्यांना ही संधी दिली असल्याचे सांगण्यात येते. तर खडसे यांचे वय झाले असल्याने त्यांना डावलण्यात आले असावे असेही बोलले जात आहे.

खडसे हे मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात खडसे यांचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील विधाने करणे सुरूच असल्याने त्यांना या कार्यकारिणीत घेऊन संधी देण्यापेक्षा भाजपने दुर्लक्ष करत त्यांना भाजपचे दरवाजे बंद केले आहेत. विधानसभा निवडणुकीत खडसे यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपने त्यांच्या मुलीला संधी दिली तर खासदारकीसाठी सुनेला निवडले होते. त्यातही मुलीचा पराभव झाल्यानंतर खडसे यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांना तिथेही डावलेले गेले. यामुळे मागील काही दिवसांत खडसे यांची यामुळे नाराजी उफाळून आली होती.

हेही वाचा - भाजपकडून पंकजा मुंडेंसह विनोद तावडेंना राष्ट्रीय पातळीवर संधी

भाजपकडून नवीन कार्यकारिणीत ज्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामागील जात समुहाचे गणितही लक्षात घेण्यात आले आहे. खडसे ज्या समुहाचे आहेत, तो लेवा-पाटील हा समूह इतर जात समुहाच्या तुलनेत कमी लोकसंख्येचा आहे. त्यातच भाजपने या समुहात आपले जाळे नव्याने मजबूत करण्यासाठी अनेकांना समोर आणले असतानाच खडसेंना मात्र बाजूला ठेवण्याची रणनिती यशस्वी केली आहे.
भाजपने आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत खडसे यांना नाकारले असले तरी फडणवीस विरोधी गटातील पंकजा मुंडे, विजया रहाटकर, विनोद तावडे आदींना संधी देत दुसरीकडे फडणवीस यांनाही आवरण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीतील यादीवरून दिसून आले आहे, असे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.

हेही वाचा - सरकार पाडण्याचा खटाटोप आम्ही करणार नाही- केंद्रीय मंत्री दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.