मुंबई - भाजपमधील ओबीसी नेत्यांची आणि एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. ओबीसी नेत्यांनी खडसेंची भेट घेत त्यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा केली. तर समाजाची पुढील भूमिका काय असेल याविषयीही चर्चा केली. येत्या 15 दिवसात पुन्हा एकदा बैठक घेऊन ओबीसी नेते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हेही वाचा - जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार
तर यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना, ओबीसी समाजावर व नेत्यांवर भाजपने गेल्या काही वर्षात अन्याय केला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा ओबीसी नेते जे. डी. तांडेल यांनी दिला आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी केली बाळासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी, 23 जानेवारीला उभारणी
ओबीसी नेत्यांच्या बैठकीला प्रकाश शेंडगे, भूषण बरे, जेडी तांडेल आणि इतर ओबीसी समाज उन्नती संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही वर्षात ओबीसी नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु, भाजपने या नेत्यांवर अन्याय केला. ओबीसी नेत्यांचे एकेक करून तिकीट कापण्यात आले. अशाप्रकारे ओबीसी नेत्यांना नष्ट करण्याचा घाट हा भाजप पक्षाने घातला आहे. भाजप पक्ष हा 'शेटजी' आणि 'भटजी' यांचा आहे, असा आरोप ओबीसी नेत्यांनी केला.