ETV Bharat / state

प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देणं ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी -  एकनाथ गायकवाड - एकनाथ गायकवाड

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड हे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 20, 2019, 9:06 AM IST

Updated : Apr 20, 2019, 9:18 AM IST

मुंबई - साध्वी प्रज्ञा ठाकूरला लोकसभा निवडणुकीत उभे करणे ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हुतात्मा हेमंत करकरेंचा अपमान देश सहन करणार नाही. जनता निश्चित भाजपला धडा शिकवील. मोदींचा प्रचारही भरकटला आहे, अशी टिका मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केली. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड

देशाची लोकशाही संकटात

यावेळी गायकवाड म्हणाले की, देशातील लोकशाही संकटात असून भाजप व्यक्तीच्या नावाने प्रचार करत आहे. हा देश व्यक्तिकेंद्रीत देश कधीच नव्हता. संघाने स्वातंत्र्याला विरोध केला. मी मुंबईत आलो त्यावेळी हमाल होतो, परंतु त्याचे भांडवल कधी केले नाही. जनता मतदानातून निश्चित भाजपला धडा शिकवील, असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंविषयी बोलताना गायकवाड म्हणाले की, राज ठाकरेंमुळे परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. शिवसेनेचा मतदार आता काँग्रेसला मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, शहरी लोकसंख्या वाढत आहे. स्मार्ट सिटी ही चांगली संकल्पना होती. झोपडपट्टी निर्मुलन आणि रिफ्यूजी कॅम्पचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. धारावी पुर्नविकास अजूनही प्रलंबित आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्पोरेट कार्यालय पूर्ण होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहू शकले नाही. मोदी सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. नोटबंदी आणि जीएसटीने धारावीसह देशातील लहान उद्योग नष्ट झाले. जीएसटीची पुर्नरचना केली पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Intro:Body:3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal

MH_MMPS_Eknath_ Gaikwad19.4.19
देशाची लोकशाही संकटात
एकनाथ गायकवाड : उमेदवार दक्षिण - मध्य

मुंबई :देशाची लोकशाही संकटात असून भाजपा व्यक्तिच्या नावानं प्रचार करत आहे. हा व्यक्तिकेंद्रीत देश कधीच नव्हता. संघाने स्वातंत्र्याला विरोध केला. मी मुंबईत आलो त्यावेळी हमाल होतो, परंतु त्याचे भांडवल कधी केले नाही. जनता मतदानातून निश्चित भाजपाला धडा शिकवील असे, मुंबई दक्षिण- मध्य लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप
कार्यक्रमात सांगितले.यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, शहरी लोकसंख्या वाढतेय. स्मार्ट सिटी ही चांगली संकल्पना होती. झोपडपट्टी निर्मुलन आणि रिफ्युज़ी कँम्पचा प्रश्न अजूही सुटलेला नाही. धारावी पुर्नविकास अजूनही प्रलंबित आहे.

शहरी लोकसंख्या वाढतेय. स्मार्ट सिटी ही चांगली संकल्पना होती. झोपडपट्टी निर्मुलन आणि रिफ्युज़ी कँम्पचा प्रश्न अजूही सुटलेला नाही. धारावी पुर्नविकास अजूनही प्रलंबित आहे, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचं कार्पोरेट कार्यालय पूर्ण होतं. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं उभं राहू शकली नाहीत. मोदी सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. नोटबंदी आणि जीएसटीने धारावीसह देशातील लहान उद्योग नष्ट झाले. जीएसटीची पुर्नरचना केली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.

बाईट:
राज ठाकरेंमुळं परिवर्तनाची नांदी सुरु झालीय. शिवसेनेचा मतदार आता कॉंग्रेसला मतदान करणार आहे.दहशतवादी साध्वी प्रज्ञा ठाकुरला लोकसभेला उभं करणं ही भाजपची बौध्दीक दिवाळखोरी आहे. शहीद हेमंत करकरेंचा अपमान देश सहन करणार नाहीत. जनता निश्चित भाजपाला धडा शिकवील. मोदींचा प्रचारही भरकटला आहे.
-कॉंग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड
Conclusion:
Last Updated : Apr 20, 2019, 9:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.