ETV Bharat / state

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईकरांसाठी चालवणार आठ विशेष 'लोकल रेल्वे' - चर्चगेट ते विरार

Special Local Trains : ग्रेगरियन नवीन वर्षानिमित्त पश्चिम रेल्वेच्या वतीनं आठ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार या मार्गावर या विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

मुंबई लोकल
मुंबई लोकल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 9:42 AM IST

मुंबई Special Local Trains : नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ग्रेगरियन नववर्षाच्या पूर्वसंध्या म्हणजे 31 डिसेंबरला मध्यरात्री पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून विशेष आठ लोकल रेल्वे चालवल्या जाणार आहेत. मुंबईतील नागरिकांसाठी पश्चिम रेल्वे मंडळानं या विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय.

आठ विशेष लोकल धावणार : सरत्या वर्षाच्या मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण रात्रभर मुंबईत फिरत असतात. यामुळं नवीन वर्षाच्या निमित्तानं पश्चिम रेल्वे प्रशासनानं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री आठ विशेष लोकल रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय. 31 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री आणि 1 जानेवारी 2024 पहाटेपर्यंत चर्चगेट रेल्वे स्थानकापासून विरार रेल्वे स्थानकापर्यंत चार विशेष लोकल रेल्वे धावतील. तर विरार पासून ते चर्चगेट पर्यंत चार लोकल रेल्वे धावतील. अशा एकूण आठ विशेष लोकल रेल्वे सेवा पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणार आहेत.

चर्चगेटवरुन कधी सुटणार लोकल : पश्चिम रेल्वेच्या सर्वात वर्दळीच्या चर्चगेट रेल्वे स्थानकाहून रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी पहिली लोकल सुटेल. ही लोकल विरार इथं 2 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता दुसरी लोकल सुटेल आणि 3 वाजून 40 मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. तिसरी लोकल 2 वाजून 30 मिनिटांनी सुटून सकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी विरारला पोहोचेल. तर शेवटची लोकल 3 वाजून 25 मिनिटांनी सुटून सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

विरारहून लोकल कधी : विरार इथून मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी पहिली विशेष लोकल रेल्वे निघेल. तर 1 वाजून 52 मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल. दुसरी लोकल 12 वाजून 45 मिनिटांनी सुटून चर्चगेट इथं 2 वाजून 22 मिनिटांनी पोहोचेल. मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी तिसरी लोकल निघून 3 वाजून 17 मिनिटांनी चर्चगेट रेल्वे स्थानकावर पोहोचेल. शेवटची लोकल 3 वाजून 5 मिनिटांनी सुटून चर्चगेट इथं सकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी पोहोचणार आहे.

"31 डिसेंबर रोजी नवीन वर्ष संपणार असून 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्ष सुरु होत आहे. त्यामुळं प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी व उत्साह पाहता आठ विशेष रेल्वे पश्चिम रेल्वे मंडळाकडून चालवण्यात येणार आहेत." - सुमित ठाकूर, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

हेही वाचा :

  1. Ashadhi Ekadashi : चर्चगेट स्थानकात लोकल रेल्वेचे प्रवाशी विठू माऊलीच्या दिंडी सोहळ्यात तल्लिन
  2. Western Railway News : प्रवाशांना दिवाळी भेट! सोमवारपासून एसी लोकलच्या 17 फेऱ्यांत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.