मुबंई : देशातील सर्व राज्यांमध्ये रोजेदार ईदच्या सण साजरा केला जात आहे. अनेक मशिदींमध्येही नमाज अदा केली जात आहे. तसेच मुंबईतील माहीम दर्गाह येथेही मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे.
-
#Maharashtra | People offer namaz at Mumbai's Mahim Dargah on the occasion of #EidUlFitr pic.twitter.com/pHalpwKPrq
— ANI (@ANI) April 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Maharashtra | People offer namaz at Mumbai's Mahim Dargah on the occasion of #EidUlFitr pic.twitter.com/pHalpwKPrq
— ANI (@ANI) April 22, 2023#Maharashtra | People offer namaz at Mumbai's Mahim Dargah on the occasion of #EidUlFitr pic.twitter.com/pHalpwKPrq
— ANI (@ANI) April 22, 2023
ईदगाह मैदानावर नमाज : मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यातील ईदगाह मैदानावर शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज पडण्यासाठी गर्दी केली होती. यावर्षीची पहिली सार्वजनिक नमाजी नऊ वाजता ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी मुख्य मौलाना याने मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली. या नमाजला लहान थोरासह, वयोवृद्ध, अपंग असे सर्वच मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा : ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला 'जकात' असं संबोधले जाते. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही जकात देऊन नमाज पठण करण्यास जाते. नमाजानंतर परताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असे म्हटले जाते. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते. मुस्लिम धर्माच्या उपदेशाप्रमाणे नमाज पडल्यानंतर गोरगरीब लोकांना ईदी दिली जाते. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तसेच पुणे पोलीस अधीक्षक रितेश कुमार यांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
कुराण पठण करण्यावर अधिक भर : मुख्य मौलाना यांनी सांगितले की, सकाळी नऊ वाजता पहिली नमाज आदा करण्यात आली आहे. यावेळी सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, समाजा समाजामध्ये भेदभाव न करता माणुसकीच्या नात्याने सर्व समाजाने आपला आचरण करावे असा उद्देश सुद्धा देण्यात आला आहे. मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वे पाळावी लागतात.
बुलडाणा जिल्ह्यातही सामूहिक नमाज पठण : रमजान ईदचा चंद्र दिसल्यानंतर अनेकांनी केलेले महिन्याभराचे रोजे पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने रमजान ईद साजरी केली जात आहे. आज बुलढाण्यात रमजान ईद निमित्त इदगाहवर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम समाजात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता आज रमजान ईदने झाली. ईदगावर सकाळी नऊ वाजता मुस्लिम धर्मगुरू समवेत प्रार्थना करून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली .एकमेकांना अलिंगन देऊन मुस्लिम बांधव ईदीच्या शुभेच्छा देत असल्याचही पाहायला मिळत आहे.