ETV Bharat / state

राज्यातील एसटी महामंडळाकडे 2 हजार 400 कोटी थकीत; एसटी वाहतुकीवर होणार परिणाम - एसटी महामंडळ

आता पुन्हा एकदा कोरोनामुळे कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे चाक आर्थिक गर्तेत अडकून पडलेले आहे. एसटीला लागणाऱ्या डिझेल आणि  स्पेअर पार्ट आणि टायरला पुरवठादारकांचे पैसे थकीत आहेत. अंदाजे यांची रक्कम 2 हजार 400 कोटी रुपये इतकी आहे.

राज्य एसटी महामंडळ
राज्य एसटी महामंडळ
author img

By

Published : May 3, 2021, 9:59 PM IST

मुंबई - गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी एसटी प्रवासी महसूलात घट झाली आहे. सध्या एसटीला लागणाऱ्या स्पेअर पार्ट आणि डिझेलचा खर्च एकूण 2 हजार 400 कोटी रुपयांची देणे बाकी आहे. त्यामुळे पुरवठादारकांची देणी दिली नाही तर एसटीच्या वाहतूकीला फटका बसण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

2400 कोटीची देणी थकीत

गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाची चाक हळूहळू रुळावर येत होते. मात्र, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने आणि इतर कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने प्रवाशांची आवक अत्यंत कमी आहे. आता पुन्हा एकदा कोरोनामुळे कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे चाक आर्थिक गर्तेत अडकून पडलेले आहे. एसटीला लागणाऱ्या डिझेल आणि स्पेअर पार्ट आणि टायरला पुरवठादारकांचे पैसे थकीत आहेत. अंदाजे यांची रक्कम 2 हजार 400 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे पुरवठादारकांचे पैसे तातडीने दिले नाही तर राज्यभरातील एसटी महामंडळाची वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

'महसूलापेक्षा खर्च जास्त'

एसटी महामंडळाला दरवर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत असे फक्त 7 हजार 800 कोटी इतका महसूल मिळतो. तर एसटी महमंडळाच्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणता इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीची प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोट्यात वाढ होत आहेत. तसेच गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे तर एसटी महामंडळ तोट्याच्या खाईत अडकून पडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सध्या तोट्यातून तारण्यासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे दोन हजार कोटीची मागणी केलेली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीव्ही भारताला दिली आहेत.

'आर्थिक मदत करणे हे सरकारचे कर्तव्य'

राज्याच्या सर्वांगीण विकासात एसटीचा मोठा वाटा आहे. आजपर्यंत विविध कराच्या रूपात 70 वर्षात करोडो रुपये राज्य व केंद्र शासनाला एसटीने दिले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य प्रवाशांची एसटी अडचणीत आहे. त्यामुळे एसटीला आर्थिक मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे व ते सरकारने पार पाडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

हेही वाचा-ऑक्सिजनच्या तुटवड्याने दिल्लीमधील रुग्णांची दमछाक...न्यायालयाची केजरीवाल सरकारला नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.