ETV Bharat / state

दिवाळीनंतर पुढच्या पंधरा दिवसांत 'त्या' सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार - विद्यार्थी पुनर्परीक्षा

जे विद्यार्थी नापास होतील, त्यांची फेरपरीक्षा, जी पाच ते सहा महिन्यांनी घेतली जाते; पण ती देखील एक महिन्याच्या आत घेतली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विविध विद्यापीठांत झालेल्या परीक्षांच्या निकालांबद्दल माहिती दिली.

uday samant
उदय सामंत
author img

By

Published : Nov 6, 2020, 4:00 PM IST

Updated : Nov 6, 2020, 4:31 PM IST

मुंबई - काही विद्यार्थ्यांना परतीच्या पावसामुळे, पुरामुळे, नैसर्गिक आपत्तींमुळे, कंटेंटमेंट झोनमुळे, तसेच परिवारातील व्यक्ती तसेच स्वत: त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांची दिवाळीनंतर पुढच्या पंधरा दिवसांत परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना.

ते म्हणाले, जे विद्यार्थी नापास होतील, त्यांची फेरपरीक्षा, जी पाच ते सहा महिन्यांनी घेतली जाते; ती देखील एक महिन्याच्या आत घेतली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विविध विद्यापीठांत झालेल्या परीक्षांच्या निकालांबद्दल माहिती दिली. मुंबई विद्यापीठासह राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये परीक्षा पार पडल्या आहेत. 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर केवळ दोनच विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली होती. 43 टक्के निकाल जाहीर झाले आहेत. तसेच उर्वरीत निकाल जाहीर होत आहेत. यात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88 टक्के असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - 'त्या' विद्यार्थ्यांना 2021मध्ये पुन्हा जेईई अ‌ॅडव्हॉन्स परीक्षा देता येणार

इतर विद्यापीठातील निकाल पुढीलप्रमाणे -

  1. नागपूर विद्यापीठ - उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.50 टक्के
  2. जळगाव विद्यापीठ - उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95 टक्के
  3. नांदेड विद्यापीठ - उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85 टक्के
  4. सोलापूर विद्यापीठ - उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98 टक्के
  5. पुणे विद्यापीठ - उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87 ते 90 टक्के (निकाल बाकी)
  6. एसएनडीटी महिला विद्यापीठ - उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90 टक्के
  7. मुक्त विद्यापीठ - सर्वच विद्यार्थी ऑनलाइन
  8. अमरावती विद्यापीठ - 98 टक्के उत्तीर्ण
  9. गोंडवाना विद्यापीठ - 92 टक्के
  10. रामटेक संस्कृत विद्यापीठ - 94 टक्के
  11. कोल्हापूर विद्यापीठ - 93 टक्के
  12. औरंगाबाद विद्यापीठ - उत्तीर्ण प्रमाण 80 ते 85 टक्के (निकाल बाकी)
  13. अभियांत्रिकी, पदवी- पदविका; औषधनिर्माण शास्त्र - उत्तीर्ण प्रमाण 99.37 टक्के
  14. कला संचालनालय - उत्तीर्ण प्रमाण 94 टक्के

Last Updated : Nov 6, 2020, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.