ETV Bharat / state

ED summons to Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार? ईडीने बजावले समन्स

मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने समन्स पाठवले. हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगिण्यात आले आहे.

ED summons to Hasan Mushrif
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Mar 11, 2023, 8:55 PM IST

Updated : Mar 11, 2023, 10:54 PM IST

मुश्रीफ यांच्या घरावर छापे

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने मुश्रीफांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानी छापेमारी केली. दरम्यान, ईडीने हसन मुश्रीफांना साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी समन्स बजावले आहे.

ईडीने बजावले समन्स : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगिण्यात आले आहे.

मुश्रीफ यांच्या घरावर छापे

ईडीने पहाटेच टाकली होती धाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीची धाड पडली आहे. यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी ईडीच्या पथकाने हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी धाड टाकली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत केंद्रीय तसेच कोल्हापुर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या कारवाईचा कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी : ईडीने आज पहाटेच मुश्रीफांच्या निवासस्थानी छापेमारी केल्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि किरीट सोमय्या तसेच ईडीविरोधात येथे जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, हसन मुश्रीफ हे अधिवेशन संपून आज कोल्हापुरात येणार असल्याने पहाटेपासूनच अनेक कार्यकर्ते आपले विविध कामे घेऊन हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र अचानक ईडीचे अधिकारी आल्याने कार्यकर्ते आणि गावकरी देखील संभ्रमात पडले होते. मात्र, ईडीचे अधिकारी असल्याचे कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घरी न जाता तेथेच आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात नसल्यामुळे त्यांच्या मुलांची आणि कुटुंबातील व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ? : कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. यानंतर ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा : ED Raid Hasan Mushrif House : हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा; घरासमोर कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन

Last Updated : Mar 11, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.