मुंबई ED Seizes Assets: रामचंद कोटुमल इस्रानी, मोहम्मद फारूक सुलेमान दरवेश आणि मनोहरलाल सतराम अगीचा, मेसर्स असोसिएटहाय प्रेशर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड याचे प्रवर्तक (Mumbai) आणि संचालक एम/सतराम यांच्या मालकीची ही मालमत्ता बँक फसवणूक प्रकरणात हस्तगत करण्यात ईडीला यश आलं आहे.
यांच्या मालकीच्या होत्या मालमत्ता: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तात्पुरत्या स्वरुपात २.८८ कोटी किमतीची जंगम मालमत्ता जप्त केली आहे. 2.88 कोटी रुपयांची 9 निवासी आणि व्यवसाय करत असलेली जागा ईडीने जप्त केली आहे. तर 4 मुदत ठेवी आणि ५ टर्म डिपॉझिट जप्त करण्यात आल्या असून ह्या ठेवी पी. जे. मॅथ्यू, थॉमस मॅथ्यू यांच्या मालकीच्या 5 मुदत ठेवी, सेलीन मॅथ्यू, जोसेफ मॅथ्यू, मेसर्स मुनावरा असोसिएट्स, प्रो. महमूद नैना प्रभू, मेसर्स मॅथ्यूसन टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड, मेसर्स हायटेक बिझनेस सर्व्हिसेस, मेसर्स ब्लॅक पँथर सिक्युरिटी सर्व्हिसेस, श्रीमती झुलैहा उम्मल मोहमूद नैना पी आणि एल एडॉल्फस यांच्या आहेत. नर्सिंग स्थलांतरितांसाठी प्रति २० हजार रक्कम असताना निर्धारित २० हजार रुपयांपेक्षा 100 पट जास्त रक्कम वसूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या तपासात गुन्ह्याचे निष्पन्न: ED ने कलम 173(2) अंतर्गत सीबीआयद्वारे दाखल केलेल्या अंतिम अहवाल अथवा चार्जशीटच्या आधारे तपास सुरू केला आहे. एर्नाकुलमच्या विशेष न्यायाधीशांसमोर भारतीय दंड संविधानाच्या विविध कलमांखाली दंडनीय गुन्ह्यांसाठी CRPC, 1860, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि इमिग्रेशन कायदा, 1983 नियमांद्वारे निर्धारित केलेल्या कमाल रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारून गुन्हा केल्याची नोंद करण्यात आली आहे. ईडीच्या तपासात असे दिसून आले की पी. जे. मॅथ्यू, थॉमस मॅथ्यू, श्रीमती सेलीन मॅथ्यू, जोसेफ मॅथ्यू, मे. मुनावरा असोसिएट्स, मेसर्स मॅथ्यूसन टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड, मेसर्स हाय-टेक बिझनेस सर्व्हिसेस, मेसर्स ब्लॅक पँथर सिक्युरिटी सर्व्हिसेस, मेसर्स कॉन्कॉर्ड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, मेसर्स कार्लटन बिल्डर्स अँड इंजिनिअर्स प्रा. लि., मेसर्स ऑन द गो रेस्टॉरंट प्रा. लि., महमूद नयना प्रभू, राजन वर्गीस, बिन्सी जोसेफ, श्रीमती झुलैहा उम्मल मोहमूद नैना पी आणि एल. एडॉल्फस यांनी हा गुन्हा केला आहे.
जंगम मालमत्तेच्या जप्तीचे आदेश जारी: संबंधित इतर गुन्हे हे जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात गुन्ह्यातून मिळालेली अथवा मिळवलेली मालमत्ता आहे. म्हणून 2.88 कोटी किमतीची समतुल्य मालमत्ता तात्पुरती जप्त केली गेली आहे. तत्पूर्वी, एकूण ७.५२ कोटी किमतीच्या अनेक जंगम मालमत्तेच्या जप्तीचे आदेश जारी करण्यात आले होते. पीएमएलए, 2002 अंतर्गत पी.जे. मॅथ्यू आणि इतरांविरुद्ध पीएमएलए केसेस, एर्नाकुलमसाठी विशेष न्यायालयासमोर फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली होती आणि ती प्रलंबित आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा: