लखनऊ : ED raids Mumbai house of Gayatri Prasad Prajapati : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सरकारमधील मंत्री राहीलेले खाण घोटाळ्यातील आरोपी तत्कालीन खाण मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या मुंबईतील तीन ठिकाणांवर ईडीने सोमवारी (15 जानेवारी)रोजी छापे टाकले. गायत्री प्रसाद यांनी घोटाळ्यातील पैशाने मुलं आणि सुनांच्या नावावर सहा फ्लॅट्सची खरेदी केल्याचं तपासात समोर आलयं. ईडीकडून आता हे फ्लॅट्स जप्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.
अनेक मालमत्तांची कागदपत्रेही जप्त केली : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीनं प्रसाद प्रजापती यांची 36.94 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ईडीला गायत्री यांच्या बेहिशोबी मालमत्तेची माहिती मिळाली होती. त्यानंतर लखनौ विभागाचे पाच सदस्यीय पथक सोमवारी मुंबईत पोहोचलं. त्यानंतर ईडीकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये क्रिसेंट बिल्डिंगमधील इतर तीन फ्लॅट आणि बोरिवलीतील बालाजी कॉर्पोरेशन बिल्डिंगमधील दोन आलिशान फ्लॅटचा समावेश होता. तसंच, यावेळी पथकानं इतर अनेक मालमत्तांची कागदपत्रेही जप्त केली.
कुटुंबाची चौकशी केली : गायत्री यांनी हे फ्लॅट त्यांचे दोन मुलं अनिल आणि अनुराग प्रजापती आणि सुना यांच्या नावावर खरेदी केले होते. प्रत्येक फ्लॅटची किंमत दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. ईडीच्या दाव्यानुसार, मुंबईत खरेदी केलेल्या या सर्व फ्लॅट्सचे बहुतांश पेमेंट रोख स्वरूपात करण्यात आले होतं. आता सुमारे 15 कोटी रुपयांचं फ्लॅट जप्त करण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर गायत्रीच्या मुलं आणि सुनांनाही बोलावून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी, ईडीने राजधानी मोहनलालगंजमधील इंद्रजीत खेडा येथे सेवक राम सहायच्या नावावर गायत्री यांनी खरेदी केलेली 10 बिघा जमीन जप्त केली होती. इतकेच नाही तर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आतापर्यंत एजन्सीने गायत्री आणि तिच्या कुटुंबाची 36.94 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
हेही वाचा :
1 राहुल गांधींची न्याय यात्रा देशातील अन्यायाविरोधात लोकचळवळ उभी करेल - पृथ्वीराज चव्हाण
2 'वरळी' बस नाम ही काफी है! आगामी निवडणुकांच्या संघर्षाचं केंद्र
3 दावोस परिषदेसाठी 34 कोटींची तरतूद, करोडोंमध्ये गुंतवणूकीचा मुख्यमंत्र्यांचा दावा