ETV Bharat / state

Leaders on ED's Radar: महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या या नेत्यांविरुध्द ईडीचे शुक्लकाष्ठ

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Maharashtra) सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आलेल्या ईडीच्या नोटिस (ED charges against leaders of Mahavikas Aghadi) हा राज्यात ऑपरेशन लोटसचा (Operation Lotus) एक भाग असल्याच्या चर्चां वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आघाडीतील नेते व संबंधित नातेवाईक ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कोण आहेत हे नेते व त्यांच्यावर कोणते आरोप केले गेले याचा सविस्तर आढावा.

author img

By

Published : Feb 23, 2022, 1:49 PM IST

Updated : Feb 23, 2022, 2:01 PM IST

मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकार ईडी, सीबीआय अशा केंद्रिय संस्थांचा गैर वापर करत असल्याचा सातत्याने आरोप करत आहे. आर्थिक अनियमीतता किंवा घोटाळ्याच्या तक्रारीवर इडी कारवाया करत असते. ईडी ने नवाब मलीकांना चौकशीसाठी बोलावल्या नंतर या संदर्भातल्या चर्चा वाढल्या आहेत. महाविकास आघाडी तील ई़डीच्या रडारवर असलेले नेते आणि त्यांच्यावरील आरोप.

नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकास मंत्री
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) ईडीच्या रडारवर आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मनी लाँड्रींग प्रकरणी ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. जुन्या मालमत्ता व्यवहारांप्रकरणी नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असून पहाटेच ईडीचे पथक मलिकांच्या घरी धडकल्याचे सांगितले जातेय. मलिकांनी यापूर्वी अनेकदा ईडीचे अधिकारी आपल्या घरी छापा टाकणार असल्याचे म्हटले होते. कोणत्याही कारवाईचा सुगावा लागल्यानंतर ते जाहीरपणे त्याची उघडणी करतात. परंतु आज अचानकपणे ईडीच्या कार्यालयात नवाब मलिक दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (President NCP Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यावर ईडीनकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या एफआयआरनुसार 1 जानेवारी 2007 ते 31 मार्च 2017 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे 25 हजार कोटींचे नुकसान झाले. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालकांची 70 नावं आहेत. त्यापैकी 50 जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. ही नोटीस शरद पवार यांना आल्यानंतर 27 सप्टेंबरला मी स्वत ईडी कार्यालयात उपस्थित राहून ईडीच्या अधिकार्‍यांना माहिती देणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. ईडी अधिकार्‍यांनी असे न करता गरज असल्यास आम्ही स्वत बोलवू असे स्पष्ट केले. त्यानंतर पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही.

​अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ईडीने अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केल्यानंतर देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आरोप काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांची याआधी चौकशी केली होती. मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून अनिल देशमुख यांना चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आणि ती त्यांच्या विविध संस्था व बनावट कंपन्यांमध्ये वळवण्यात आली असा आरोप ईडीने केला आहे.

प्रताप सरनाईक, शिवसेना आमदार
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागेही ईडीचा ससेमिरा लागला आहे. सरनाईक यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी सुरु होती. प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत.

असे आहेत आरोप?
मनी लाँडरिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड एनएसईएल आणि टिटवाळा येथील एका जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक यांची मुले विहंग व पूर्वेश तसेच निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावरही या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान प्रताप सरनाईक हे प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी या कंपनीत ब्रिटनहून मुंबई पोहोचलेल्या परदेशी निधीचा गैरवापर झाला, असा सक्तवसुली संचालनालयाचा संशय आहे.

एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे नेते
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्यांचे जावई गिरिश चौधरीहे सुद्धा अडचणीत सापडले आहेत. ईडीने गिरीश चौधरी यांना अटकही केली आहे.

आरोप काय?
पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६ मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. प्रत्यक्षात त्या भूखंडाची किंमत ३१ कोटी रुपये होती. एकंदर गैरव्यवहार बघता या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.
ईडीतील सूत्रांनुसार या व्यवहारात खडसे यांच्या वतीने गिरीश चौधरी यांनी बेंचमार्क बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीमार्फत हा भूखंड खरेदी केला. त्यासाठी बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीला प्रोफिशियन्स मर्केंडाइज, अब्जायोनी ट्रेडिंग, अदामिना ट्रेडिंग, केमेक्सगूड्स प्रा. लि. व पर्ल डीलर्स प्रा. लि. या पाच कंपन्यांपकडून पैसे मिळाले. या पाच कंपन्यांनादेखील याआधी समन्स बजावण्यात आला होता. परंतु, त्या कंपन्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मुळात त्या सर्व बनावट कंपन्या असल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री
सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अवैध रीतीने खरेदी करणे आणि मनी लाँडरिंग अशा आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी कंपनीची सुमारे ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

हे आहेत आरोप ?
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतील पीएमएलए फौजदारी कलमांन्वये चिमणगाव ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, कारखान्याचा प्रकल्प आणि यंत्रसामग्री जप्त करण्याचा हंगामी आदेश ईडीने काढला आहे.

कारवाई का?
- राज्य बँकेच्या संचालकांनी आपल्याच नातेवाइकांना कारखान्याची अल्प भावात विक्री केली,
- त्यात एसएआरएफएईएसआय कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप,
- या कारखान्याने पुढे पुणे जिल्हा बँकेकडून ७०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले

अनिल परब, परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते
राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांची सक्तवसुली संचालनालय कडून चौकशी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांना ईडीने दोनदा समन्स बजावले होते. याआधी ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल परब यांनी चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्यानुसार अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते त्यांची मुंबई पोलीस दलातील बदल या संदर्भात झालेल्या घर व्यवहारात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपाखाली 8 तास चौकशी करण्यात आली होती.

आरोप काय?
अनिल देशमुखप्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली. विशेषत: बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली. यानुसार, या प्रकरणात अनिल परब यांचादेखील सहभाग असल्याचा संशय आहे. मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये दिली होती, असे वाझे याने न्यायालयालाही सांगितले आहे. या सर्व माहितीनुसार, यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच प्रकरणाच्या प्रत्यक्ष चौकशीसाठी परब यांना हा समन्स बजावण्यात आले आहेत.

राऊत यांच्या पत्‍नींना होती नोटीस
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी संशयित असलेले प्रवीण राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये 55 लाख रुपये ट्रान्सफर झाले होते. या 55 लाख रुपयाच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ईडीकडून 28 डिसेंबर 2020 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. वर्षा राऊत या यासंबंधी दोन वेळा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित झाल्या होत्या. ईडीची चौकशी होण्याआधीच हे 55 लाख रुपये वर्षा राऊत यांनी परत केले होते

रवींद्र वायकर, शिवसेना नेते तथा आमदार
अलिबागमधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमीनीचे करार करण्यात आले. जमीनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

अविनाश भोसले यांची ईडीकडून मालमत्ता जप्त
कांग्रेसचे मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत ईडीने कारवाई केली. ही कारवाई 21 जून रोजी करण्यात आली होती. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात केली. या आधीही भोसले यांची दोन वेळा चौकशी करण्यात होती. अविनाश भोसले यांची सर्व पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत वैयक्तिक हितसंबंध आहेत. त्यामुळे अविनाश भोसले यांच्यावर झालेले कारवाईचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यापर्यंत पोहोचू शकतील याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
युपीए सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते. 2008-09 च्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्याशी संपर्कात होते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले. त्याबद्दल दीपक तलवार यांना 272 कोटी रूपये मिळाले. यामुळे एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने लावला होता. याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसताना 70 हजार कोटी रूपयांची 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलिनीकरण या प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत होता. याप्रकरणी ईडीने जून 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांना नोटीस बजावली होती. त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात आले होते.

Last Updated : Feb 23, 2022, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.