मुंबई - राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडत असून ठाकरे गटातील मोठ्या नेत्याला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) दणका दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Shiv Sena leader Anil Parab ) यांची संपत्ती ईडीकडून जप्त ( Anil Parab property seized ) करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ( ED action in case of Sai Resort in Dapoli ) ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.
-
ED has provisionally attached assets worth ₹ 10.20 Crore in connection with money laundering probe against Anil Parab, Sai Resort NX & others .
— ED (@dir_ed) January 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ED has provisionally attached assets worth ₹ 10.20 Crore in connection with money laundering probe against Anil Parab, Sai Resort NX & others .
— ED (@dir_ed) January 4, 2023ED has provisionally attached assets worth ₹ 10.20 Crore in connection with money laundering probe against Anil Parab, Sai Resort NX & others .
— ED (@dir_ed) January 4, 2023
जवळपास चार ते पाच दिवस झाली होती चौकशी : अनिल परब यांची एवढ्या कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्डिरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची वारंवार चौकशी झाली. जवळपास चार ते पाच दिवस ही चौकशी झाली होती.
अनिल परबानी मालकी लपवल्याचा आरोप - रत्नागिरीतील केबल व्यावसायिकांचीही चौकशी या प्रकणात करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक, तलाठी यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.भाजपचे नेते किरीट सोमय्या या प्रकरणावरून आक्रमक होत असल्याचं वारंवार दिसून आलं. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली.
42 गुंठे जमिनीसह साई रिसाॅर्टची मालमत्ता जप्त - विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत, महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ईडीने मुरुड दापोली मधली 42 गुंठे जमीन, साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.