ETV Bharat / state

Sai Resort Scam : अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; साई रिसॉर्ट प्रकरणी बिझनेस पार्टनरला ईडीकडून अटक, 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी

महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे. दापोली साई रिसॉर्टशी संबंधित घोटाळ्यात ईडीने त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली होती. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 10, 2023, 8:44 PM IST

Updated : Mar 11, 2023, 9:17 PM IST

मुंबई - साई रिसॉर्ट प्रकरणी आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले सदानंद कदम यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. साई रिसॉर्ट प्रकरण भाजप नेते किरीट सौमय्या यांनी लावून धरले होते.

  • #UPDATE | Mumbai: ED arrests former Maharashtra minister Anil Parab's business partner, Sadanand Kadam after questioning.

    ED conducted a search at his residence earlier today & issued him a summon to appear before the agency, in a scam related to Dapoli Sai Resort.

    — ANI (@ANI) March 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोमय्या विरुद्ध परब - माजी खासदार किरीट सोमय्या विरुद्ध आमदार अनिल परब यांच्यात गेल्या काही दिवसांपासून साई रिसॉर्टचा वाद रंगला. दापोली येथील साई रिसॉर्ट हे आमदार अनिल परब यांच्या मालकीचे आहे. तसेच ते अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी सर्वांत आधी केला. तसेच या रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली होती.

साई रिसॉर्टवर प्रतिकात्मक हातोडा - साई रिसॉर्ट माझे नसल्याचा दावा सातत्याने अनिल परब यांच्याकडून केला जात होता. ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. दुसरीकडे हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले होते.या रिसॉर्टवर कारवाई होणार असल्याचे सोमय्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच याआधी सोमय्या दापोलीत आले होते. तसेच त्यांनी प्रतिकात्मक हातोडा या रिसॉर्टवर मारला होता.

रिसॉर्टवर ईडीने छापे - अनिल परब यांच्या मालमत्तांवर 26 मे 2022 रोजी ईडीने छापेमारी केली होती. दापोली तालुक्यातील साई रिसॉर्टवरही छापेमारी केली होती. दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टमध्ये ईडीचे अधिकारी चौकशीसाठी सकाळी 6.30 वाजता दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळपर्यत ही चौकशी सुरु होती.

साई रिसॉर्टचे सदानंद कदम मालक? - साई रिसॉर्ट सदानंद कदम यांनी विकत घेतले असले तरी त्यात अनिल परब यांचे हितसंबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केला होता. आयकर विभागाने केलेल्या चौकशीत साई रिसॉर्ट बांधण्यासाठी केलेल्या खर्चाबाबत देखील माहिती घेतली. त्यानंतर 26 मे 2022 रोजी अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ई़डीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होते.

हेही वाचा - Kirit Somaiya on Sai Resort : साई रिसॉर्टवर आज हातोडा पडणारच; किरीट सोमय्या दापोलीत

Last Updated : Mar 11, 2023, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.