ETV Bharat / state

'टॉप्स ग्रुप'च्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला 'ईडी'कडून अटक - टॉप्स ग्रुपच्या एम शशीधरण अटक

ईडीकडून तपासात टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक शशीधरण यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईडी अधिकाऱ्यांसोबत एम. शशीधरण चौकशीमध्ये सहकार्य करीत नव्हता. यानंतर ईडीकडून त्यास अटक करण्यात आली आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Dec 8, 2020, 4:01 PM IST

मुंबई - सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी 'टॉप्स ग्रुप'च्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला अटक करण्यात आली आहे. टॉप्स ग्रुपच्या एम. शशीधरण या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या संदर्भात टॉप्स ग्रुपच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या अगोदर टॉप्सकडून सुरक्षा पुरवण्याचे काम पाहणाऱ्या अमित चांदोलेला अटक करण्यात आली होती, त्यानंतर ही दुसरी अटक आहे.

ईडीकडून या संदर्भात तपास केला जात असताना टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक शशीधरण यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईडी अधिकाऱ्यांसोबत एम. शशीधरण चौकशीमध्ये सहकार्य करीत नव्हता. यानंतर ईडीकडून त्यास अटक करण्यात आली आहे.

अमित चांदोलेला नऊ डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी

दरम्यान, या अगोदर अटक करण्यात आलेला अमित चांदोले याची ईडी कोठडी विशेष न्यायालयाने देण्यास नकार दिल्यामुळे ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत अमित चांदोले याची न्यायालयीन कोठडी रद्द केली होती. यानंतर विशेष न्यायालयाने अमित चांदोले याला नऊ डिसेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.