ETV Bharat / state

ई-संजीवनी ओपीडीचे मोबाइल ॲप अखेर कार्यान्वित, आजारावर मिळणार ऑनलाईन वैद्यकीय सल्ला - आरोग्य सेवा अ‌ॅप मुंबई बातमी

ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. राज्यभरात आतापर्यंत १ हजार ६०६ जणांनी यासेवेचा लाभ घेतला आहे. आता मोबाईल ॲप तयार झाल्याने त्याचा वापर सामान्यांकडून अधिक प्रमाणात वाढेल. त्यानुसार आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढवता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

ई-संजीवनी ओपीडीचे मोबाईल ॲप अखेर कार्यान्वित

author img

By

Published : Jun 26, 2020, 5:13 PM IST

Updated : Jun 30, 2020, 5:24 PM IST

मुंबई : कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. याआधी ही सेवा केवळ संगणक आधारित असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा होत्या. आता ॲण्ड्राइड आधारित ॲप तयार झाल्याने त्याचा फायदा स्मार्टफोनधारकांना घेता येईल. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल. आतापर्यंत १ हजार ६०० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मेमध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्याचबरोबर या सेवेचे मोबाईल ॲप महिनाभरात तयार करण्यात येईल, असे त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार हे ॲप तयार झाले आहे.

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत १ हजार ६०६ जणांनी यासेवेचा लाभ घेतला आहे. आता मोबाईल ॲप तयार झाल्याने त्याचा वापर सामान्यांकडून अधिक प्रमाणात वाढेल. त्यानुसार आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढवता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाइन ओपीडी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd&hl=en_US

असे आहे ई-संजीवनी ओपीडी ॲप :

१) नोंदणी करणे - मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

२) लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगइन करता येते.

३) डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.

Last Updated : Jun 30, 2020, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.