ETV Bharat / state

'ई-ऑफिस प्रणाली सोपी आणि सुलभ असावी' - मुंबई ई ऑफिस

विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच ई ऑफिस प्रणालीच्या सर्व विभागांच्या सचिव आणि संबंधित मंत्र्यांसमोर सादरीकरण करावे. तशा सूचनाही देण्यात याव्यात. ज्यामुळे ई ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात येणारा पत्रव्यवहार हाताळतांना संबंधितांना त्यासंबंधीच्या सूचना व त्यांनी पाठवलेल्या पत्रावरची कार्यवाही करावी. तसेच ई ऑफिस प्रणाली सुरक्षित आणि परिपूर्ण असावी, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री
author img

By

Published : Apr 1, 2021, 8:16 PM IST

मुंबई - माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-ऑफिस प्रणाली अधिक सोपी, सुटसुटीत आणि वापरण्यास सुलभ करावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण केले, यावेळी ते बोलत होते.

ज्या विभागात मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची निर्मिती होते, त्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच ई-ऑफिस प्रणालीच्या सर्व विभागांच्या सचिव आणि संबंधित मंत्र्यांसमोर सादरीकरण करावे. तशा सूचनाही देण्यात याव्यात. ज्यामुळे ई-ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात येणारा पत्रव्यवहार हाताळतांना संबंधितांना त्यासंबंधीच्या सूचना व त्यांनी पाठवलेल्या पत्रावरची कार्यवाही करावी. तसेच ई-ऑफिस प्रणाली सुरक्षित आणि परिपूर्ण असावी, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, १५ शासकीय विभागांच्या १५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण दिल्याची माहिती, विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली आहे.

हेही वाचा-नाशिकमध्ये बेडविना रुग्णाचा मृत्यू होतो; सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?

हेही वाचा-मुंबईत जुगार अड्ड्यावर 'एनआयए'चा छापा, मॅनेजरची चौकशी सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.