ETV Bharat / state

Aids Patient : एड्स रुग्णांसाठी "ई निरंतर" प्लॅटफॉर्म, घरबसल्या, रांगेशिवाय घेता येणार उपचार - How Does AIDS Occur

१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने "ई निरंतर" हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ( E Nirantar Digital Platform For AIDS Patients  ) आहे. याचा फायदा एड्स रुग्णांना होणार आहे.

E Nirantar Digital Platform
ई निरंतर हा डिजिटल प्लॅटफॉर्म
author img

By

Published : Dec 1, 2022, 3:37 PM IST

मुंबई : मुंबईमधील एड्स झालेल्या रुग्णांना कोरोनाच्या काळात रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने रुग्णालयात जाऊन उपचार करणे कठीण झाले होते. आजही अनेक रुग्णांना रुग्णालयात जाऊन औषधे घेणे, डॉक्तरांचा सल्ला घेता येत नाही. यावर उपाय म्हणून १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने "ई निरंतर" हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ( E Nirantar Digital Platform For AIDS Patients ) आहे. याचा फायदा एड्स रुग्णांना होईल अशी माहिती उप संचालक आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कुमार करंजकर यांनी दिली.

ई निरंतर हा डिजिटल प्लॅटफॉर्म

ई निरंतर प्लॅटफॉर्म : लैंगिक असुरक्षित संबंधांमुळे मोठ्या प्रमाणात एड्स हा जीवघेणा आजरा नागरिकांना होतो. हा आजार एकाचे रक्त दुसऱ्याला चढवताना रक्तामधून तसेच इंजेक्शनची सुई एकमेकांना वापरल्यास, गरोदर मातेला एड्सची लागण झाली असल्यास तीच्या बाळाला हा आजार होऊ( How Does AIDS Occur ) शकतो. एड्स झालेल्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याला आयुष्यभर उपचार आणि औषधे घ्यावी लागतात. अशा रुग्णांना महिनाभराची औषधे दिली जातात. काही रुग्ण बेडवर आहेत. त्यांना उपचार आणि औषधे घेण्यासाठी रुग्णालयात येणे शक्य होत नाही. रुग्णालयात मोठ्या रांगा असल्याने रुग्ण औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. यासाठी येत्या एड्स दिनापासून ई निरंतर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे फाईल शोधण्यापेक्षा एका क्लिकवर रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे किंवा डॉक्टरांची वेळ घ्यायची आहे ते सुद्धा यावरून डॉक्टरांची वेळ घेऊ शकतात असे डॉ. करंजकर यांनी ( AIDS Treatment At Home Without Queue) सांगितले.

जेलमधील कैद्यांवरही उपचार होणार : मुंबईमध्ये भायखळा आणि आर्थर रोड याठिकाणी जेल आहेत. या जेलमध्ये ड्रग्स घेणारे कैदी आहेत. जेलमध्ये बंदी असलेल्या या कैद्यांना ड्रग्स मिळत नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. अशा कैद्यांवर उपचार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याला जेल प्रशासन आणि इतर सरकारी यंत्रणांकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे १ डिसेंबरपासून जेलमधील कैद्यांवरही उपचार होणार आहेत असेही डॉ. करंजकर यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकावर जनजागृती : “एड्स या आजाराबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी या आजाराच्या तपासणीसाठी पुढाकार घ्यावा यासाठी रेल्वे स्थानकावर एड्सच्या तपासणीचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, मानखुर्द आणि बोरिवली आदी ९ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

मुंबईमधील एड्स रुग्णसंख्या : २०१९ - २० मध्ये ४ लाख ७५ हजार ५४० लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४४७३ (०.९ टक्के) रुग्णांना एड्सची लागण झाली असून ४०७३ (९१.१ टक्के) रुग्णांना उपचाराची गरज पडली. २०२० - २१ मध्ये २ लाख ३६ हजार ३९२ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २०६३ (०.९ टक्के) रुग्णांना एड्सची लागण झाली असून १९२७ (९३.४ टक्के) रुग्णांना उपचाराची गरज पडली. २०२१ - २२ मध्ये ३ लाख ८७ हजार ३९९ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३०८७ (०.८ टक्के) रुग्णांना एड्सची लागण झाली असून २९३७ (६५.१ टक्के) रुग्णांना उपचाराची गरज पडली. २०२२ - २३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत २ लाख ५२ हजार ९६२ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९१० (०.८ टक्के) रुग्णांना एड्सची लागण झाली असून १७७४ (९२.९ टक्के) रुग्णांना उपचाराची गरज पडली.

जागतिक एड्स दिन : दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.