मुंबई - मुंबईत भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा फायदा घेत मुंबईत अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. 25 मार्च 2020 पासून ते 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत तब्बल 9558 अनधिकृत बांधकामे केली गेल्या पुढे आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी यासंदर्भात अतिक्रमण आणि निर्मुलन शहर कार्यालयाकडे माहिती अधिकारात अनधिकृत बांधकामावर काय कारवाई केली, या विषयी माहिती मागवली. याद्वारे मिळालेली माहिती धक्कादायकच होती. मुंबईत 25 मार्च 2020 पासून 28 फेबुवारी 2021 पर्यंत ऑनलाइन (RETMS) तक्रार प्रणालीवर एकूण 13325 तक्रार नोंद झाली आहे. त्यात 3767 दुबार तक्रार नोंद आहे, तर 9558 अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यातील फक्त 466 बांधकामावरच कारवाई झाल्याची माहिती आहे.
कोणत्या विभागात किती तक्रारीची नोंद आणि किती बांधकामावर कारवाई
- A विभागात एकूण 32 तक्रार, 8 दुबार तक्रार, 24 अनधिकृत बांधकाम, फक्त 1 बांधकामवर कारवाई.
- B विभागात एकूण 368 तक्रार, 186 दुबार तक्रार, 182 अनधिकृत बांधकाम, फक्त 2 बांधकामवर कारवाई.
- C विभागात एकूण 614 तक्रार, 225 दुबार तक्रार, 389 अनधिकृत बांधकाम, फक्त 24 बांधकामवर कारवाई.
- D विभागात एकूण 151 तक्रार, 73 दुबार तक्रार, 78 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 बांधकामवर कारवाई.
- E विभागात एकूण 579 तक्रार, 143 दुबार तक्रार, 436 अनधिकृत बांधकाम, तसेच एकही बांधकामवर कारवाई झाली नाही.
- F/NORTH विभागात एकूण 148 तक्रार, 58 दुबार तक्रार, 90 अनधिकृत बांधकाम, फक्त 9 बांधकामवर कारवाई.
- F/SOUTH विभागात एकूण 297 तक्रार, 83 दुबार तक्रार, 214 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 बांधकामवर कारवाई.
- G/NORTH विभागात एकूण 203 तक्रार, 23 दुबार तक्रार, 180 अनधिकृत बांधकाम, फक्त 7 बांधकामवर कारवाई.
- G/SOUTH विभागात एकूण 212 तक्रार, 90 दुबार तक्रार, 122 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 बांधकामवर कारवाई.
- H/EAST विभागात एकूण 451 तक्रार, 219 दुबार तक्रार, 232 अनधिकृत बांधकाम, फक्त 11 बांधकामवर कारवाई.
- H/WEST विभागात एकूण 525 तक्रार, 96 दुबार तक्रार, 429 अनधिकृत बांधकाम, फक्त 21 बांधकामवर कारवाई.
- K/EAST विभागात एकूण 441 तक्रार, 46 दुबार तक्रार, 395 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 बांधकामवर कारवाई.
- K/WEST विभागात एकूण 342 तक्रार, 40 दुबार तक्रार, 302 अनधिकृत बांधकाम, फक्त 58 बांधकामवर कारवाई.
- L विभागात एकूण 3251 तक्रार, 1249 दुबार तक्रार, 2002 अनधिकृत बांधकाम, फक्त 52 बांधकामवर कारवाई.
- M/EAST विभागात एकूण 1194 तक्रार, 20 दुबार तक्रार, 1174 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 बांधकामवर कारवाई.
- M/WEST विभागात एकूण 1213 तक्रार, 526 दुबार तक्रार, 687 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 बांधकामवर कारवाई.
- N विभागात एकूण 280 तक्रार, 40 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 बांधकामवर कारवाई.
- P/NORTH विभागात एकूण 429 तक्रार, 87 दुबार तक्रार, 342 अनधिकृत बांधकाम, फक्त 62 बांधकामवर कारवाई.
- P/SOUTH विभागात एकूण 416 तक्रार, 183 दुबार तक्रार, 233 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.
- R/NORTH विभागात एकूण 595 तक्रार, 90 दुबार तक्रार, 505 अनधिकृत बांधकाम, फक्त 14 बांधकामवर कारवाई.
- R/SOUTH विभागात एकूण 348 तक्रार, 34 दुबार तक्रार, 314 अनधिकृत बांधकाम, सर्वात जास्त 75 बांधकामवर कारवाई.
- R/CENTRAL विभागात एकूण 398 तक्रार, 202 दुबार तक्रार, 196 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 बांधकामवर कारवाई.
- S विभागात एकूण 589 तक्रार, 37 दुबार तक्रार, 552 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 बांधकामवर कारवाई.
- T विभागात एकूण 249 तक्रार, 9 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 बांधकामवर कारवाई.
हेही वाचा -संभाजीराजे, आंदोलनात चालढकल चालत नाही - चंद्रकांत पाटील