ETV Bharat / state

Train schedule : रेल्वे वेळापत्रक बदलाने नागरिक त्रस्त, प्रवासी सेवाभावी संस्थेची पश्चिम रेल्वेच्या विभागीय कार्यालयात धडक

author img

By

Published : Nov 22, 2022, 11:01 AM IST

१ आँक्टोबर २०२२ पासून झालेल्या रेल्वे वेळापत्रक बदलामूळे अनेक गाड्यांच्या वेळात बदल होऊन अनेक प्रवाशांच्या प्रवासाची घडी विस्कटली आहे. गाड्यांच्या अनियमितते मूळे दैनंदिन प्रवाशांना रोजच्या रोज कार्यालयात उशीरा पोहचणे, तसेच गाड्यांमधील वाढलेल्या अंतरामूळे अनियंत्रित गर्दीचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा (Neeraj Verma) यांची त्यांच्या मुंबई येथिल कार्यालयात भेट घेऊन प्रवाशांचे प्रश्न अत्यंत कठोर स्वरुपात मांडले.

Train schedule
रेल्वे वेळापत्रक बदलामूळे

पालघर: १ आँक्टोबर २०२२ पासून झालेल्या रेल्वे वेळापत्रक बदलामूळे अनेक गाड्यांच्या वेळात बदल होऊन अनेक प्रवाशांच्या प्रवासाची घडी विस्कटली आहे. त्यातच नविन वेळापत्रकातील गाड्याही नियमितपणे वेळेवर चालवण्यात पश्चिम रेल्वेचे प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. गाड्यांच्या अनियमितते मूळे दैनंदिन प्रवाशांना रोजच्या रोज कार्यालयात उशीरा पोहचणे, तसेच गाड्यांमधील वाढलेल्या अंतरामूळे अनियंत्रित गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यातच मेल एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येत असलेल्या प्राधान्यामूळे उपनगरीय गाड्यांना बाजूला काढून दैनंदिन प्रवाशांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे प्रकार होत आहेत.
या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा (Neeraj Verma) यांची त्यांच्या मुंबई येथिल कार्यालयात भेट घेऊन प्रवाशांचे प्रश्न अत्यंत कठोर स्वरुपात मांडले.

दैनंदीन प्रवाशांना होणाऱ्या अडचणींचा पाढा: १. कोरोना काळात बंद करण्यात आलेली डहाणू हून विरार साठी सुटणारी सकाळी ७:०५ मिनिटांची लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी करतानाच ही गाडी सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण येत नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने तयार केलेल्या अभ्यासपुर्ण वेळापत्रकासह वर्मा ह्यांच्या समोर मांडला. (problems faced by daily commuters) २. सफाळे स्थानकातील लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा रद्द केल्याने दैनंदीन प्रवाशांना होणाऱ्या अडचणींचा पाढा विभागीय व्यवस्थापकांकडे मांडताना एक तर थांबा पुर्ववत करणे किंवा सकाळी त्याच वेळेत लोकल सुरु करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. ३. नविन वेळापत्रकात झालेल्या बदलामूळे गाड्यांमधील वाढलेल्या अंतराचा फटका, परिचारीका, शिक्षक बंधू भगीनी, विद्यार्थी तसेच इतर कामगार वर्गाला बसत असल्या मुद्दा प्रखरपणे मांडत शिष्टमंडळाने गाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी वेळापत्रकच विभागीय व्यवस्थापकांना सादर करुन त्यावर सविस्तर चर्चा केली. ह्याच मुद्याच्या अनुषंगाने ३०० शिक्षकांच्या सह्यांचं निवेदन रुपाली राऊत यांनी विभागीय व्यवस्थापकांना सादर केले.

ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली: ४. मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देऊन उपनगरीय गाड्या बाजूला काढून दैनंदिन प्रवाशांना दुय्यम वागणूक देण्याच्या प्रकाराबद्दल शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. (Demanded to take concrete measures) ५. वाढत्या गर्दीचा विचार करता डहाणू ते विरार १५ डबा गाडी सुरू करणेसाठी उमरोळी व इतर स्थानकातील फलाटाची लांबी वाढवणे,स्थानकात सी सी टीव्ही,पालघर व बोईसर स्थानकात कोच इंडिकेटर बसवणे. मुंबई नंदुरबार पँसेंजरला वैतरणा स्थानकात थांबा देणे ह्या मागण्याही पुन्हा करण्यात आल्या.
संस्थेच्या शिष्टमंडळाने नमूद केलेल्या वरील विषयांबाबत नीरज वर्मा ह्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा प्रथम विचार केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

कंट्रोलच्या अकार्यक्षमतेमूळे आपले प्रवासी भरडले: यावेळी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या मागील पाच वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी "प्रवास" ही स्मरणिका विभागीय व्यवस्थापकांना भेट देण्यात आली. संस्थेच्या शिष्टमंडळात नागदेव पवार , सतीश गावड , दयानंद पाटील , महेश पाटील , प्रतिक पाटील व रूपाली राऊत ह्यांचा समावेश होता. वरील सर्व विषयांच्या अनुषंगाने डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने काही दिवसांपुर्वी पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना निवेदन सादर केले होते. त्या वेळी झालेल्या चर्चेत हिमाशू वर्तक, विराग म्हात्रे व प्रथमेश प्रभूतेंडोलकर ह्यांनी वलसाड कंट्रोलच्या अकार्यक्षमतेमूळे आपले प्रवासी भरडले जात असल्याचा व वलसाड कंट्रोल मुंबईत आणण्याचा मुद्दा आमदारांकडे अधोरेखित केला होता. त्याची तातडीने दखल घेऊन आमदार वनगा यांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांना पत्र लिहुन उपाययोजना करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ह्यांनाही ह्या विषयात लक्ष घालण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.