ETV Bharat / state

मुंबईत लसीकरणाला सुरुवात नाही; अपडेट झालेल्या 'कोविन अ‌ॅप'मध्ये तांत्रिक अडचणी - मुंबई कोरोना लसीकरण तिसरा टप्पा न्यूज

जानेवारी महिन्यात देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सला लस दिली जात आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना देखील कोरोनाची लस दिली जाणार आहे. मात्र, काही ठिकाणी नाव नोंदणीसाठी तांत्रिक अडचणी येत आहेत.

Mumbai Corona Vaccination
मुंबई कोरोना लसीकरण न्यूज
author img

By

Published : Mar 1, 2021, 12:10 PM IST

मुंबई - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. आजपासून तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. मुंबईत देखील सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार होती. मात्र, कोविन ॲपच्या नवीन अपडेटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लसीकरणाला सुरुवात झाली नाही.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लस -

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त आणि 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लस देण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आज ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार होती. मात्र, अपडेट झालेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लसीकरणाला सुरुवातच झाली नाही.

काय म्हणाले नोडल अधिकारी?

मुंबईच्या सायन रुग्णालयात लसीकरणा दरम्यान कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने लसीकरणाला सुरुवात करता आली नाही. मात्र, जे लस घेण्यासाठी आले होते त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता लिहून घेतलेला आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करून त्यांना लस दिली जाईल, अशी माहिती सायन रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. विजय कुमार सिंह यांनी दिली.

नागपुरातही तांत्रिक अडचणी -

आजपासून तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. नागपुरातील ११ शासकीय केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक जेष्ठ नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागले. त्यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.