ETV Bharat / state

Chandrakant Bawankule Criticism: महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळला

Chandrakant Bawankule Criticism: कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्रातील सोलापूरपासून अक्कलकोट सहित जतमधील 40 गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्रातील सरकारने गावांचा विषय सोडून द्यावा, असा इशारा दिला. कर्नाटक सरकारच्या आव्हानाला शिंदे- फडणवीस सरकारने सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.

Chandrakant Bawankule Criticism
Chandrakant Bawankule Criticism
author img

By

Published : Dec 7, 2022, 5:12 PM IST

मुंबई: महाष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर वातावरण तापले आहे. मराठी माणसांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्रातील संघटनांनी दिला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे केलेल्या विधानामुळे सीमावाद चिघळला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले आहे. तसेच शिंदे- फडणवीस सरकार सीमावादाचा प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वातावरण खराब करु नका, असा सल्ला द्यायला बावनकुळे विसरले नाहीत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आगीत तेल ओतले: कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्रातील सोलापूरपासून अक्कलकोट सहित जतमधील चाळीस गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्रातील सरकारने गावांचा विषय सोडून द्यावा, असा इशारा दिला. कर्नाटक सरकारच्या आव्हानाला शिंदे- फडणवीस सरकारने सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चितावणीखोर वक्तव्य केल्याचे सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आगीत तेल ओतले. कर्नाटक राज्यात महाराष्ट्रातील गाड्यांवर झालेल्या हल्ल्याची त्यात भर पडल्याने वातावरण तंग झाले आहे.

शिंदे सरकार षंढ आणि नामर्द: शिंदे- फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा भूमिका घेत कर्नाटकला जाब विचारण्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सीमाभागातील मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे सरकार षंढ आणि नामर्द असल्याची टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सीमा प्रश्न तातडीने सोडवा: कोणतीही अनुचित घटना देशाला किंवा महाराष्ट्राला परवडणारी नाही. मंत्री गेले नाहीत, म्हणून सरकार षंढ आहे. धमक नाही, ही भाषा संजय राऊत यांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे आणि फडणवीस यांच्यात कशी आहे. हे संजय राऊत यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचे उत्तर सामाजिक वातावरण बिघडवून मिळत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानांमुळे वातावरण सीमावाद चिघळला, असे बावनकुळे म्हणाले.

जनतेकडून भूमिका घेतली: तसेच मागच्या अडीच वर्षात तुमचे सरकार होते, तर सीमा भागाच्या प्रश्नात त्यांनी काय भूमिका घेतली? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला. सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने ही जनतेकडून भूमिका घेतली आहे. एसटी फोडणे, गाड्या फोडणे ही लोकशाहीची लक्षणे नाहीत. राज्य सरकारला विनंती करणार असून सीमा प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी आणि हा विषय लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पत्रव्यवहारही करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

संजय राऊतांवर इतर कैदांचा प्रभाव: संजय राऊत जी भाषा बोलत आहेत. कदाचित जेलमध्ये राहल्याने इतर कैद्याकडून त्यांनी ही भाषा शिकली असावी. षंढ, नामर्द, आमदारांना रेडा म्हणणे, हा कदाचित इतर कैद्यांबरोबर राहल्याचा प्रभाव असू शकतो. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, हे माहिती नाही. महाराष्ट्र अशी वाक्य सहन करत नाही. सकाळी येऊन वाईट बोलने एवढच काम सध्या संजय राऊतांना आहे. मातोश्रीमसोर हनुमान चालिसा म्हणू म्हणणाऱ्या नवनीत राणा यांना तुम्ही जेलमध्ये टाकले, त्यांना वाईट वागणूक दिली. हा खरा षंढपणा आहे, ही खरी नामर्दांगी आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे संयमाने काम करत आहेत. त्यामुळे राऊतांनी त्यांना आव्हान देऊ नये. वादग्रस्त विधाने केली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये, असा सल्ला बावनकुळे यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.