मुंबई: बोरिवली पूर्व क्वार्टर परिसरातील शशी को. ऑफ. हाऊसिंग सोसायटी समोर हे प्रकरण घडले आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला 25 मे रोजी दुपारी 1.30 वाजता घटनेची माहिती मिळाली. याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून या घटनेचा तपास सुरू केला. मृत प्रवीणचा भाऊ सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्रवीण हा भावाला न सांगता मुंबईत आला आणि मद्यधुंद अवस्थेत फिरत होता. तो नाशिकचा रहिवासी आहे.
जमावाकडून बेदम मारहाण: पोलिसांनी सांगितले की, प्रवीण लहाने हा मद्यधुंद अवस्थेत सोसायटीची भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. चौकीदाराने त्याला चोर समजून बांबूने हाता-पायावर बेदम मारहाण केली. त्यामुळे दारूच्या नशेतील प्रविणचा मृत्यू झाला. कस्तुरबा पोलिसांनी तपासादरम्यान पाच जणांना अटक केली. यामध्ये 2 चौकीदार जोरासिंग जलाराम भट्ट (35), जनक मोतीराम भट्ट (32) आणि 3 सोसायटी सदस्य हर्षित गांधी (27), मनीष गांधी (52), हेमंत रांभिया (54) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाण्यात युवकाला बेदम मारहाण: ठाणे येथेही अशीच धक्कदायक घटना घडली आहे. सासऱ्याला फोन केल्याच्या संशयावरून कोरम मॉलमध्ये फिर्यादी बीपीन लालजी करीया (41) याला भेटण्यासाठी बोलवले. पाच जणांनी लाकडी दांड्याने नग्न करून बेदम मारहाण केली. तर आरोपीविरूध अपहरण, बेदम मारहाण आणि ठार मारण्याची धमकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नग्न करून मारहाण: रंगोली साडीच्या दुकानाचा मालक याच्या सासऱ्याला फोन केल्याच्या संशयावरून कोरम मॉलमध्ये फिर्यादी बीपीन लालजी करीया (41) याला भेटण्यासाठी बोलावून त्याचे इनोव्हा कारमधून अपहरण करण्यात आले. येऊर येथील आरोपी रसिक बोरीच्या याच्या बंगल्यावर रसिक बोरीचा, अनिल फरिया, फरिया आणि बंगल्यावरील दोन इसम अशा पाच जणांनी लाकडी दांड्याने नग्न करून बेदम मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचजणांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरण, बेदम मारहाण आणि ठार मारण्याची धमकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ठाण्यातील प्रसिद्ध रंगोली साडी दुकानाचे मालक रसिक बोरीचा यांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा: