ETV Bharat / state

तस्कर राहिल विश्रामला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

बॉलिवूडमधील काहींना अमली पदार्थ पुरविणाऱ्या राहिलला गुरुवारी (दि. 17सप्टें.) एनसीबीने अटक केली होती. त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 19, 2020, 5:17 PM IST

मुंबई - अमली पदार्थ पुरविणाऱ्या राहिलला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आहे. गुरुवारी (दि. 17 सप्टें.) एनसीबीच्या मुंबई पथकाने त्याला अटक केेली होती.

बॉलिवूडमध्ये अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या साखळीतील राहिल हा एक मोठा तस्कर असल्याचे बोलले जात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने मुंबईच्या पवई भागात गुरुवारी केलेल्या छापेमराीत काही जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात सुमारे 500 ग्रॅम उच्च प्रतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. हे अमली पदार्थ 6 ते 8 हजार रुपये प्रती ग्रॅम दराने बाजारात विक्री होते.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने अमली पदार्थाच्या दिशेने वळण घेतले आहे. या प्रकरणी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. रियाकडून बॉलिवूडमधील अमली पदार्थाच्या सेवनाबाबत व तस्कराबाबत अनेक खुलासे केले जात आहे. त्यानुसार एनसीबीकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून काहींन ताब्यात व काहींना चौकशीसाठी बोलविण्यात येत आहे. राहिल हा बॉलिवूडमधील मंडळींना अमली पदार्थ पुरवणारा मोठा तस्कर मानला जात असून अनेक दिग्गजांची नावे राहिलच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - कोकण, गोव्यात जोरदार पावसाची शक्यता; मराठवाडा विदर्भातही बरसणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.