ETV Bharat / state

Thane Crime: इराणी कबिल्यातील सुंदरी निघाली ड्रग डीलर; एमडी ड्रग्जसह चरस हस्तगत

इराणी कबिल्यात ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या तरुणीला पोलिसांनी पकडताच ती ड्रग डीलर असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सबा सैय्यद असे ड्रग डीलर तरुणीचे नाव आहे. आता खडकपाडा पोलीसांनी एमडी ड्रग्स आणि चरस, गांजा जप्त केला आहे. सबा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने तपासात मोठे घबाड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Thane Crime
सबा सैय्यद ड्रग डीलरला अटक
author img

By

Published : May 24, 2023, 10:05 PM IST

माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे

ठाणे : कल्याण डोंबिवली शहरासह आसपासच्या शहारत विविध प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री मोठ्याप्रमाणात वाढली आहे. कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबवली रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या इराणी कबिल्यात गेल्या 2 वर्षापासून आतापर्यत पोलिसांनी 50 हुन अधिक सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. याविरोधात विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाकडून नशेच्या सौदागरांना सापळा रचुन मुद्देमालासह अनेकांना अटक कोली आहे. कल्याण कसारा लोहमार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाच्या लागून असलेल्या इराणी कबिल्यात राहणारी सबा ही आंबिवली, मोहने, तसेच आसपासच्या परिसरात मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जसह चरस, गांजा या अंमली पदार्थाच्या नशेचा व्यापार करत असल्याची गुप्त माहिती कल्याण मधील खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.

ड्रग्ससह चरसचा साठा आढळला: या गुप्त माहितीच्या आधारे, मंगळवारी खडकपाडा पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवली परिसरात असेलेल्या एका बेकरी समोर सापळा रचला होता. त्यावेळी इराणी कबिल्यातील सबा ही संशयित रित्या आढळून आली. पोलिस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर सबाची पोलिसांनी अधिक चौकशी करून झाडाझडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला.

मंगळवारी आंबिवली परिसरात असेलेल्या एका बेकरी समोर सापळा रचला होता. त्यावेळी इराणी कबिल्यातील सबा ही संशयित रित्या आढळून आली. त्यावेळी तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला. - सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त

जिल्हा सत्र न्यायालयात हजर: दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी तिच्याकडून एम डी ड्रग्जसह चरस, गांजा हस्तगत केला. तिच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून, तिला अटक केली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या ड्रग डीलर सबाला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. आता खडकपाडा पोलीस एमडी ड्रग्स आणि चरस, गांजा आरोपी सबाने कुठून आणले आणि ती कोणाला विक्री करत होती. याचा तपास पोलीस पथकाने सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली आहे.

खडकपाडा पोलिसांनी सबाला अटक केली आहे. बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्स आणि चरस, गांजा आरोपी सबाने कुठून आणले आणि ती कोणाला विक्री करत होती. याचा तपास सुरू आहे. - सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त

अंमली पदार्थ आढळले: तीन दिवसापूर्वीच भिवंडीतील सौदागर मोहल्ल्यात राहणाऱ्या एका नशेच्या सौदागाराला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने, भिवंडीतील गजबजलेल्या मंडई भागातील बाजारपेठ मधून बेड्या ठोकल्या होत्या. जमशेद ताबीज अन्सारी ( वय ३२, रा. सौदागर मोहल्ला, भोईवाडा) असे बेड्या ठोकलेल्या नशेच्या सौदागराचे नाव आहे. आरोपी जमशेदला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेत, त्याची अंगझडती घेतली. त्याच्याजवळ 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 16.50 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ आढळून आले होते.

हेही वाचा -

Thane Crime धक्कादायक भिवंडीतून तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण पोलिसांचा शोध सुरू
Thane Crime अट्टल सात गुहेगारांकडून २३ गुन्ह्यांची कबुली भिवंडी पोलिसांनी जप्त केला लाखो रुपयांचा मुद्देमाल

Thane Crime News हॉस्पिटलमध्येच नवजात बालकांच्या खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश डॉक्टरसह पाच आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.