मुंबई: समोवारी 11.45 च्या सुमारास कांदिवली लिंक रोड येथे आरटीओ पोलिसांच्या फ्लाईंग स्क्वाडद्वारे वाहनांची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या तपासणी दरम्यान शाळेचे विद्यार्थी असलेला एक खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर दिसून आला. आरटीओ पोलिसांनी हे वाहन थांबवून कागदपत्र तपासणीची मागणी केली. चालकाने कागदपत्र पोलिसांना दाखवली. कागदपत्र बरोबर असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी सदर वाहन चालकाला जाऊ दिले.
वाहन चालकाला झटका: वाहनचालक आपल्या वाहनाजवळ आला असता त्याला हृदयविकाराचा झटका आला. हा प्रकार या ठिकाणी असलेल्या आरटीओ पोलिसांच्या निदर्शनास आला. आरटीओ पोलिसांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांची मदत घेऊन वाहन चालकाला ऑस्कर या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. या मृतचालकाचे नाव शिवाजी कांबळे असून त्यांच वय ५२ वर्ष आहे. त्यांच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती देण्यात आल्याची माहिती आरटीओ पोलिसांकडून देण्यात आली.
विद्यार्थी सुखरूप: आमच्या शाळेकडे स्वतःची बस नसल्याने आम्ही खासगी वाहन विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी वापरतो. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये असलेल्या वाहन चालकाला हृदय विकाराचा झटका आला. या दरम्यान वाहनामधील दुसऱ्या वाहन चालकाने विद्यार्थी असलेले वाहन शाळेपर्यंत नेले. शाळेत हे विद्यार्थी सुखरूप पोहोचले आहेत. शाळा सुटक्यावर पालकांनी आपल्या मुलांना घेऊन जाण्याचा निरोप शाळेकडून देण्यात आला होता. अशी माहिती कांदिवलीच्या धनमाल शाळेकडून देण्यात आली आहे.
वाहन, चालकाकडे दुर्लक्ष: मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांकडे आपली स्वतःची वाहने नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर केला जातो. पालखी पालक कामामध्ये व्यस्त असल्यामुळे, या वाहनांचा उपयोग आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी करतात. मात्र ही वाहने सुरक्षित आहेत का किंवा त्यांच्या चालक सुदृढ आहेत का? याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची प्रतिक्रिया टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे राजेश पांड्या यांनी दिली आहे.