ETV Bharat / state

घाटकोपर येथे 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्राचे आमदार पराग शाह यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील घाटकोपर येथे ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार पराग शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 19, 2021, 3:35 PM IST

Updated : May 19, 2021, 5:37 PM IST

मुंबई - कोरोनाला हद्दपार करण्यासाठी वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांचे लसीकरण केंद्रावरील त्रास कमी करण्यासाठी आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच मोठा उपाय आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना लसीकरण केंद्रावरील होणाऱ्या दिरंगाईमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गाडीत बसून लस मिळण्यासाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र मुंबईत ठिक-ठिकाणी महापालिका उभारत आहे. आज (दि. 19 मे) घाटकोपरच्या पोलीस मैदानाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ आमदार शाह यांच्या प्रयत्नाने घाटकोपर विभागात पहिल्यांदाच ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्यात आले त्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज स्थानिक आमदार पराग शाह आणि खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले.

बोलताना आमदार शाह

मागील वर्षापासून जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृतांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनीही आपले जीव गमावले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच मोठा उपाय आहे. त्यामुळे मुंबई वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र स्थानिक आमदार, खासदार आणि स्थानिक प्रशासन उभारत आहेत. जेणेकरून या केंद्रावर वृद्ध आणि दिव्यांग नागरिक येऊन लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावे यासाठी या केंद्राची निर्मिती केली जात आहे.

घाटकोपर पूर्व विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे उद्घाटन

आज (दि. 19 मे) घाटकोपर पूर्व विधानसभेचे आमदार पराग शाह यांच्या हस्ते घाटकोपर विभागांमध्ये ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामध्ये विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल टॉयलेट, वाहतूक कोंडी न होण्यासाठी बॅरिकेट्सची सोय इत्यादी व्यवस्था आमदार पराग शाह यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. तसेच घाटकोपरमधील स्थानिक नागरिकांमध्ये लसीकरणांबाबात जनजागृती मोहीमही आमदार शाह यांच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच कोणत्याही दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना लस घ्यायची असेल तर त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार पराग शहा यांच्यामार्फत केलेली आहे.

हेही वाचा - अनिल देशमुख प्रकरण: अॅड. जयश्री पाटील ईडी कार्यालयात नोंदवणार जबाब

Last Updated : May 19, 2021, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.