ETV Bharat / state

Ramabai Ambedkar birth Anniversary:  रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती, जाणून घ्या त्यांच्या जीवनकार्याविषयी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात प्रत्येक पायरीवर संघर्ष होता. खुद्द बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचे तर त्यांच्यासोबत दुःख सहन करायला कोणी तयार असेल तर त्या रमाबाई आंबेडकर होत्या. ७ फेब्रुवारी हा रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस होय. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई होत्या. आज त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

Ramabai Ambedkar birth Anniversary
रमाबाई आंबेडकर यांची जयंती
author img

By

Published : Feb 7, 2023, 7:40 AM IST

Updated : Feb 7, 2023, 7:55 AM IST

मुंबई : 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो' ही एक अतिशय लोकप्रिय आणि जुनी म्हण आहे. परंतु अनेकदा प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या आयुष्यात यशाचा आधार ठरलेल्या महिलांचे, विशेषतः त्यांच्या जीवनसाथींचे योगदान कमी-अधिक प्रमाणात विसरले जाते. काही वेळेस ते लक्षातही ठेवले जाते, असेच एक उदाहरण म्हणजे, संविधान निर्माते आणि भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर हे दाम्पत्य होय.

रमाबाईंचा जन्म व बालपण : रमाबाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ होता. रमाबाईंचा विवाह १४ वर्षीय भीमराव आंबेडकर यांच्याशी १९०६ मध्ये वयाच्या ९व्या वर्षी झाला. वयाच्या ९व्या वर्षापासून सुरू झालेली संघर्षातील भागीदारीची ही प्रक्रिया ९ मे १९३५ रोजी रमाबाईंच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू होती. बाबासाहेबांनीही रमाबाईंचे आपल्या जीवनातील योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. रमाबाईंनी त्यांचे पती डॉ. आंबेडकरांना प्रत्येक संघर्षात पूर्ण साथ दिली. शेणाच्या गौऱ्या घरोघरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न रमाबाई करत असत, त्या इतरांच्या घरी काम करून बाबासाहेबांच्या शिक्षणाचा खर्च भागवत असे.

स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी : इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी संघर्ष करत होती. 1923 मध्ये भारतात परतल्यानंतर आंबेडकर दाम्पत्याच्या जीवनात थोडा आनंद आला, पण नंतर बाबासाहेबांची सामाजिक-राजकीय सक्रियता वाढली होती. परंतु त्याच्याकडे कुटुंबासाठी वेळ नव्हता पण आर्थिक संघर्ष थोडा कमी झाला होता. मात्र, खडतर जीवन संघर्षामुळे रमाबाईंची प्रकृती ढासळू लागली. उपचार काम करत नव्हते. मृत्यूपूर्वी सुमारे सहा महिने ती अंथरुणाला खिळलेली होती. 27 मे 1935 रोजी आजारपणाने त्यांची प्राणज्योत मालवली. सुप्रिया सुळेंनी त्यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

Last Updated : Feb 7, 2023, 7:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.