मुंबई : संपूर्ण भातरभर आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही पालिकेने चैत्यभूमी आणि निवासस्थान असलेल्या राजगृह येथे नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, आरोग्य सुविधा, क्लोज सर्कीट टिव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यपाल आदींनी जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
-
भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दादरच्या #चैत्यभूमी येथील त्यांच्या स्मारकास राज्यपाल #रमेश_बैस, मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, शिक्षणमंत्री @dvkesarkar, पर्यटनमंत्री @MPLodha यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/m5TWuDwSp8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दादरच्या #चैत्यभूमी येथील त्यांच्या स्मारकास राज्यपाल #रमेश_बैस, मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, शिक्षणमंत्री @dvkesarkar, पर्यटनमंत्री @MPLodha यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/m5TWuDwSp8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 14, 2023भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दादरच्या #चैत्यभूमी येथील त्यांच्या स्मारकास राज्यपाल #रमेश_बैस, मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, शिक्षणमंत्री @dvkesarkar, पर्यटनमंत्री @MPLodha यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/m5TWuDwSp8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 14, 2023
चैत्यभूमी परिसरात आकर्षक सुशोभिकरण : चैत्यभूमी स्तूप व रेलिंग याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्तूपाची विविध रंगांच्या फुलांनी सजावट केली जात आहे. उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. चैत्यभूमी येथील तोरणा गेट आणि अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणही करण्यात आले आहे. भीमज्योतीला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेकला देखील सजवण्यात आले आहे.
थेट प्रक्षेपण, लेजर शो : चैत्यभूमी परिसरात पाच एलईडी स्क्रीनद्वारे चैत्यभूमीच्या आतील अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरही थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सायंकाळी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारीत लेजर शो माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे आयोजित करण्यात आला आहे. आज महापालिकेचे एक हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. सर्व कार्यक्रमाची अत्यंत उत्साहात तयारी करण्यात आलेली आहे.
'या' सुविधा : आरोग्य तपासणी कक्ष, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी १६, थेट प्रक्षेपणासाठी पाच एलईडी स्क्रिनचा वापर, समाजमाध्यमांवर लाईव्ह प्रक्षेपण, अनुयायांसाठी मिनरल वॉटर, पिण्याच्या पाण्याची टॅंकरद्वारे २४ तास व्यवस्था, १० फिरते शौचालये, अग्निशमन दलाचे १ इंजिन आणि टॅंकर तैनात, सीसीटीव्हीची यंत्रणा, स्पीडबोटची व्यवस्था, स्वच्छतेसाठी अविरत कामगार, स्वयंसेवी संस्था स्वच्छतेसाठी मदत करणार, महानगरपालिकेचे १ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यतत्पर राहणार आहेत.