ETV Bharat / state

Mahaparinirvan Din 2022 : इंदू मिलचं काम लवकरच पूर्ण होईल; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

Mahaparinirvan Din 2022 : 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चैत्यभूमी इथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

Mahaparinirvan Din 2022
Mahaparinirvan Din 2022
author img

By

Published : Dec 6, 2022, 11:10 AM IST

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देशाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे. व्यक्तीला समान अधिकार असेल, कोणामध्ये भेद करता येणार नाही, असे संविधानात त्यांनी लिहिले आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे फक्त झाले आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din). या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमी (Chaitybhoomi) इथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. यानंतर ते या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

दिशा बदलण्याचे काम: बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. दिशा बदलण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. व्यक्तीला समान अधिकार राहणार आहे. कोणामध्ये भेद करता येणार नाही असे संविधान त्यांनी दिले आहे. आपला देश प्रगती करत आहे, कारण लोकशाही जिवंत आहे. एक मार्ग एक संधी संविधानाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचे आभार मानण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झाले आहे.

स्मारकाचा कार्यक्रमही लवकरच होईल: उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु आहे. आज राज्य सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल.

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर: दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसंच, डॉ. बाबासाहेबांचं निवास असलेलं राजगृह आणि परळ इथल्या बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तिथेही व्यवस्था करण्यात येते.

मुख्यमंत्र्याची ग्वाही: बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महा मनावामुळे सर्व ताठ मानेने उभे आहोत. माझ्यासारखा सर्व सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री झाला सेवा करण्याची संधी दिली. मी त्यांचा ऋणी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानव मुक्ती हेच ध्येय होते. दलीत बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे तो बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. सरकार स्थापन झाल्यावर आम्ही चैत्यभूमीवर येवून अभिवादन केले. त्यांनी दिलेल्या मार्गावर सरकार काम करेल. बाबासाहेबांच्या आठवणी आणि इतिहास ठेवा जपण्याचे काम केले जाईल. इंदू मिल मधील स्मारक लवकरात लवकर उभारले जाईल. सरकार आपले सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे. लोकांच्या भावना पाहिल्या लोक ५ ते ६ दिवस आधीच येथे आले आहेत. लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आलेल्या लाखो अनुयायांना सुविधा देण्याचे काम पालिका आणि सरकारने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.