ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात हुंड्यासाठी महिलांवरील अत्याचार वाढले

लॉकडाऊन काळात महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. यामध्ये हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारींचा अधिक समावेश असल्याची माहिती राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनेत मुंबई शहर आघाडीवर दिसत आहे.

dowry harassment cases
लॉकडाऊन काळात हुंड्यासाठी महिलांवरील अत्याचार वाढले
author img

By

Published : Sep 18, 2020, 12:10 PM IST

मुंबई- कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नका, असे आवाहन लॉकडाऊन काळात करण्यात आले. मात्र, याच काळात महिलांवर होणाऱ्या कौंटुबिक अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरात महिलांवरील घरगुती अत्याचारात वाढ झाली असली तरी राज्य महिला आयोगाकडे प्रत्यक्षरित्या येऊन तक्रार देण्याचे प्रमाण लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्या कारणाने कमी असल्याचे समोर आले आहे. घरगुती हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी या मुंबई शहरातून राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत.

लॉकडाऊन काळात हुंड्यासाठी महिलांवरील अत्याचार वाढले
हुंड्यासाठी हिंसाचाराच्या तक्रारी अधिक, मुंबईतून सर्वाधिक

लॉकडाऊनच्या काळात राज्य महिला आयोगाकडे आता पर्यंत राज्यभरातून एकूण ७०४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभागातून ५९ , अमरावती विभागातून ३९ , नाशिक ५१ , पुणे विभागातून ११४ , कोकण विभागातून १३२ , नागपूर विभागातून ३७ तर मुंबईतून १८७ घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या बरोबरच राज्य महिला आयोगाकडे ८५ अशा तक्रारी ईमेल द्वारे प्राप्त झाल्या आहेत. ज्यात जिल्हा किंवा विभागाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

लॉकडाऊन काळात मुंबईत महिलांवरील गुन्हे वाढले

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० या महिन्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे तब्बल ९१८ गुन्हे घडले आहेतच. यामध्ये महिलांवरील बलात्काराचे २६४ गुन्हे घडले आहेत. तर अल्पवयीन मुलींवर १७६ बलात्काराचे गुन्हे घडले आहेत. गेल्या ८ महिन्यात ४७३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. तसेच ५ महिलांच्या अपहरणाचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. हुंड्यासाठी २१८ प्रकरणात पीडित महिलांवर शाररिक आणि मानसिक अत्याचार झाल्याचे गुन्हे घडले आहेत. तर हुंड्याच्या छळातून मुंबईत १३ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांच्या माहितीनुसार राज्य महिला आयोगाकडे एरवी दिवसाला ७० तक्रारी या ई मेल, पोस्ट, किंवा प्रत्यक्ष येऊन दिल्या जात होत्या. मात्र सध्याच्या कोरोना संक्रमण परिस्थितीत पीडित महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण घटले आहे. राज्य महिला आयोगाकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर १-१८०० - २१ - ०९८० हा क्रमांक सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत सुरू असून या बरोबरच मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही पीडित महिला आपली तक्रार नोंदवू शकतात. पीडित महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराचा न्याय निवाडा करण्यासाठी सध्या राज्य महिला आयोग पोलीस व काही एनजीओच्या मदतीने सध्या लॉकडाऊन काळात काम करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.