ETV Bharat / state

...जाणून घ्या; येत्या विधानसभा निवडणुकीबाबत तरुणाईच्या काय आहेत अपेक्षा - youth view on upcomming Vidhan Sabha elections in Mumbai

येत्या निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाकडून आजच्या तरुणाईला काय अपेक्षा आहे, त्यांचे आगामी सरकारकडे काय मागण्या आहेत, याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी तरुणाईपुढे रोजगार हा मुद्दा प्रमुख असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

तरुणाई
author img

By

Published : Sep 23, 2019, 2:07 PM IST

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्याअनुषंगाने सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र येत्या निवडणुकीनंतर विजयी झालेल्या पक्षाकडून आजच्या तरुणाईला काय अपेक्षा आहेत. आगामी सरकारकडून त्यांच्या काय मागण्या आहेत, याबाबत 'ईटीव्ही भारतचे' प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी तरुणाईचे मत जाणून घेतले...

आजची तरुणाई बेरोजगार आहे. त्यांना समाजकारण, राजकारण यात काही रस वाटत नाही. फक्त पार्टी आणि मनोरंजनात आजची तरुणाई मश्गूल आहे. समाजव्यवस्थेचे त्यांना भानही नाही. अशी अनेक तथाकथित मते आजची तरुण पिढी मोडून काढत आहे. निवडणुका जवळ आल्यावर कॉलेजच्या कट्ट्यापासून ते फेसबूक आणि ट्विटरपर्यंत सगळीकडे तरुणाई निवडणुकीबाबत आपली मते ठामपणे मांडत आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीबाबत तरुणाईच्या काय अपेक्षा आहे त्याबाबत माहिती देतना तरुणाई

हेही वाचा- दम भरणारेच झाले नरम... शिवसेनेची सपशेल शरणागती

दरम्यान ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने त्यांना त्यांचे मत विचारले आसता तरुणाईने शिक्षण आणि नोकरी हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, शेतकऱ्यांचा सातबारा, मध्यम वर्गावरचे सगळे टॅक्स माफ करणे, ७२ हजारांवर नोकरभरती करणे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणे, महागाई कमी होणे, शिव स्मारकाचे काम पूर्ण करणे, असे अनेक मुद्दे तरुणाईने मांडले.

हेही वाचा- विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!

तरुणांना या निवडणुकीबद्दल काय वाटत, उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत, याबद्दल विचारल्यावर ते याबाबत मोठ्या प्रमाणात जागृत असल्याचे दिसले. ते आपल्या विचारांच्या निकषानुसार उमेदवाराची पात्रता शोधतील व आपल्या निकषांवर खरा उतरणाऱ्या उमेदवारालाच ते मतदान करतील, असे यावरून दिसून येत आहे.

Intro:या निवडणुकीत तरुणाईच्या काय अपेक्षा आहेत जाणून घ्या

आजची तरुणाई काही करत नाही, त्यांना समाजकारण, राजकारण यांत काही रस वाटत नाही. फक्त पार्टीमध्ये आजची तरुणाई मश्गूल आहे. समाजव्यवस्थेचे त्यांना भान नाही.’ अशी अनेक तथाकथित मते आजची तरुण पिढी मोडून काढते आहे. निवडणुका जवळ आल्यावर कॉलेजच्या कट्टय़ापासून ते फेसबुक आणि ट्विटरपर्यंत सगळीकडे तरुणाई निवडणुकीबाबत आपली मते ठामपणे मांडत असते त्यातच निवडणूकी बद्दल तर सर्वच बोलत असताना काही तरुणाईची मतं म्हणजेच त्यांना काय वाटत या निवडणुकी बद्दल आणि ते उमेदवारात कोणत्या बाबी बघून मतदान करणार आहेत त्याबदल ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी जाणून घेतलेली तरुणांची मतं ऐका ...

तरुणाईसाठी शिक्षण आणि नोकरी हे सर्वात महत्त्वाचे आहे,

शेतकऱ्यांचा सातबारा

मिडल क्लासवरचे सगळे टॅक्स माफ झाले पाहिजे

७२ हजारांची नोकरभरती झाली पाहिजे

बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत

महागाई कमी झाली पाहिजे

शिवस्मारकाचे काम पूर्ण करावे
अशी अनेक मुद्दे तरुणाईने मांडले आहेत.त्यांना या निवडणुकी बद्दल काय वाटतं उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल विचारल्यावर तरुण मोठ्या प्रमाणात जागृत झालेले दिसत आहेत व ते आपल्या विचारांच्या निकषानुसार उमेदवारात पात्रता शोधतील...यंदा त्याच उमेदवाराला मतदान करतील असे यावरून दिसून येत आहे.

तरुणांचे बाईट नावे या विडिओ सिक्वेन्स विनायक पाटील
समृद्धी ठाकरे
किरण सोनार
स्वाती बडे
अजय अडसूळ

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.