मुंबई - राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू किंवा दुसरा लॉकडाउन लावण्याची आवश्यकता वाटत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?
बर्याच लोकांनी मला राज्यात नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाउन लावण्याची सूचना केली. पण मला वाटत नाही की नाईट कर्फ्यू किंवा दुसरा लॉकडाउन लावला जावा. तसेच कांजूरमार्गच्या जागेचा वाद केंद्रानं आणि राज्यानं चर्चेतून सोडवला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. होय, माझ्या मुंबईबाबत मी अहंकारी आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी का नसावं?, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'प्रगतीचा मार्ग अडवू नका' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -
- सावधान राहा हा, थंडीचे आजार सर्दी खोकला ताप सुरू झाले आहे. कोरोना नियम पाळावे लागणार आहेत. लस आल्यानंतरही मास्क बंधनकारक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
- युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन करण्यात आला. युरोपात कोरोनानं रुप बदललंय, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला, युरोपातील परिस्थितीवरुन शिकलं पाहिजे, परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत.
- नवीन वर्ष आणि नाताळच्या काळात काळजी घ्या, लग्नात गर्दी वाढत आहे. अंतर पाळा आणि सावधानता बाळगा.
- सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. सरकार पडेल यासाठी अनेक जण डोळे लावून बसले होते. पण सरकारने कोरोनाचा धोका, राजकीय आरोप सांभाळत आणि विकास करत एक वर्ष पूर्ण केल आहे.