मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णसेवेसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. अशा वेळेस संकटाच्या काळात मुंबईकरांच्या मदतीला केरळमधील डॉक्टर-नर्स धावून आले आहेत. केरळमधील 40 डॉक्टर आणि 60 नर्सची टीम सज्ज असून त्यांना लवकरात लवकर मुंबईला पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती साऊथ आशियाचे डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोषकुमार यांनी दिली, तर डॉक्टर आणि नर्सेसची संख्या आणखी वाढवत किमान 50 डॉक्टर आणि 100 नर्सेस मुंबईला पुढच्या आठवड्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न असल्याचेही डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे 600 खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र, सध्या मनुष्यबळ अपुरे असल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांना पत्र लिहीत 50 डॉक्टर आणि 100 नर्सेसची मागणी 23 मे रोजी केली होती. त्यानुसार केरळमधील डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स, साऊथ अशिया या संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत 40 डॉक्टर आणि 60 नर्स मुंबईत सेवा देण्यासाठी तयार झाल्या आहेत. आता त्यांना मुंबईत रेल्वेने पाठवायचे की विमानाने याचा निर्णय घेत आठवड्याभरात त्यांना मुंबईत पाठवण्यात येईल, असे डॉ संतोष कुमार यांनी सांगितले आहे, तर आम्ही आणखी डॉक्टर-नर्सला पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यालाही प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकूण 50 डॉक्टर आणि 100 नर्सची टीम आम्ही नक्कीच मुंबईला पाठवू असे ही ते म्हणाले.
डॉ. लहाने यांनी ही केरळची टीम लवकरच मुंबईत येणार असल्याच्या वृत्ताला 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दुजोरा दिला आहे. तर त्यांच्या पत्रानुसार या टीम मधील एमबीबीएस डॉक्टरांना महिना 80 हजार, एमडी-एमएस डॉक्टरांना महिना दोन लाख तर नर्सेसना महिना 30 हजार रुपये, असा पगार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय ही राज्य सरकार करणार असून त्यांना सुरक्षेच्या सर्व सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. तेव्हा ही केरळची टीम मुंबईत आली नंतर आरोग्य यंत्रणेसाठी तो मोठा दिलासा असेल, असे म्हटले जात आहे.
केरळमधील डॉक्टर-नर्स येणार मुंबईकरांच्या मदतीला - केरळ डॉक्टर्स टीम
महालक्ष्मी रेसकोर्स येथे 600 खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र, सध्या मनुष्यबळ अपुरे असल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांना पत्र लिहीत 50 डॉक्टर आणि 100 नर्सेसची मागणी 23 मे रोजी करण्यात आली होती. त्यानुसार केरळमधील डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स, साऊथ अशिया या संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.