ETV Bharat / state

Diwali Special train : मध्य रेल्वेचे प्रवाशांना दिवाळी गिफ्ट; यूपी, बिहार, दक्षिणेत 425 विशेष ट्रेन सेवा - यूपी बिहार दक्षिणेत 425 विशेष ट्रेन्स सेवा

Diwali Special train: मध्य रेल्वेनं 425 विशेष ट्रेनची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर अमरावतीपर्यंत 103 अशा रेल्वे सेवा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा दिवाळीनिमित्त प्रवास सोयीचा होईल.

Central Railway special trains  Diwali
दिवाळी स्पेशल ट्रेन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 7:00 AM IST

मुंबई Diwali Special train : दिवाळीनिमित्त अनेकांना आपल्या मूळ गावी किंवा शहरात परतण्याची ओढ लागते. मात्र, गर्दीमुळे रेल्वे प्रवासाकरिता अनेकांनात्रासाला सामोरे जावे लागते. दिवाळीनिमित्त तीन लाख अतिरिक्त प्रवाशांची संख्या वाढणार असल्यानं मध्य रेल्वेने 425 विशेष ट्रेनची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून लाखो प्रवासी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम,ओडिशा, बंगाल, बिहार जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये जातात.

425 ट्रेन सेवा सुरू : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल ट्रेनने रोज 35 ते 40 लाख लोक प्रवास करतात. त्याशिवाय मेल एक्सप्रेस ट्रेनमधून देखील लाखो लोक प्रवास करतात.दरम्यान, दिवाळीचा सण पाहता याकाळात तीन लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करणार असल्याची शक्यता आहे. याचा अंदाज घेऊन मध्य रेल्वेनं विशेष 425 ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर, अमरावतीपर्यंत 103 अशा सेवा दिल्या जाणार आहेत.

अशा असतील विशेष ट्रेन सेवा : नांदेड ते छत्रपती शिवाजी टर्मिनसकडं जाण्याकरिता 16 अतिरिक्त सेवा असतील, तर कोल्हापूरसाठी 114 अतिरिक्त सेवा असणार आहेत. बंगळुरूसाठी 40 अतिरिक्त सेवा तर उत्तर प्रदेशातील कानपूर, वाराणसी, गोरखपूर या रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी 38 अतिरिक्त सेवा असतील. तसंच उत्तर प्रदेशातील दानापूर या रेल्वेस्थानकापर्यंत जाण्यासाठी 60 सेवा दिल्या जातील. तर समस्तीपुर ,छपरा, सीवन, हतिया, बिहारमध्ये जाणाऱ्या 36 अतिरिक्त रेल्वे सेवा असतील. मध्य प्रदेशातील इंदोर येथे जाण्यासाठी 18 अतिरिक्त सेवा मध्य रेल्वेकडून सुरू केल्या जात आहेत.

  • प्रवाशांची संख्या अधिक वाढणार : दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रिया देत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, कोरोना महामारीनंतर यंदा दिवाळीनिमित्तानं प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तीन लाखापेक्षा प्रवासांची संख्या अधिक वाढणार असल्यामुळं मध्य रेल्वेने विशेष 425 ट्रेन सेवा देण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा -

  1. Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेवर परिणाम
  2. Central Railway Ticketless Passengers: यंदा मध्य रेल्वेची धडक कारवाई! 16 कोटी 88 लाख रुपयांची विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसुली
  3. Mumbai Local Mega Block :आज प्रवासाचे नियोजन करताय? हार्बर आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.