मुंबई - मुलुंडच्या तांबे नगर परिसरातील 35 ई 51 या शिधावाटप केंद्रातून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप ग्राहकांना होत आहे. एका ग्राहकाने खरेदी केलेल्या बारा किलो गव्हामध्ये एक किलो रेती मिश्रित सिमेंट आढळून आल्याने हा प्रकार समोर आला.
हेही वाचा - 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड
समोर आलेल्या प्रकारामुळे दुकानातील इतर गोण्यांची पाहणी केल्यास तो देखील गहू खराब असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदारांनी मुलुंड शिधावाटप अधिकार्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर शिधावाटप अधिकाऱ्यांनी या दुकानांमध्ये जाऊन गव्हाचे नमुने घेतले. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिधावाटप अधिकार्यांनी तक्रारदारांना देण्यात आले.