ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'बेस्ट' करणार बाबासाहेबांच्या पुस्तकांचे वाटप; 40 जादा बसेसही उपलब्ध

author img

By

Published : Dec 4, 2019, 10:02 AM IST

यंदा बेस्टमार्फत अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत. तसेच, चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमाने 40 जादा बसेससोबतच वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

best
मनोज वर्दे, बेस्ट जनसंपर्क अधिकारी

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमाने 40 जादा बसेस सोबतच वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासोबतच यंदा बेस्टमार्फत अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत.

मनोज वर्दे, बेस्ट जनसंपर्क अधिकारी

यात जाती व्यवस्थेचे निर्मूलन, पत्रकारिता, बहिष्कृत भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यासाठी 1 लाख रुपयांची तरतूद बेस्टने केली आहे. दादर स्थानक पश्चिमेकडून शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीकडे जाण्यासाठी 'दादर फेरी' या नावाने 5 व 6 डिसेंबर रोजी 24 तास बस गाड्या चालवण्यात येणार आहेत. 7 डिसेंबरला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अतिरिक्त जादा बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

हेही वाचा - महापरीनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाण्यासाठी विशेष रेल्वे

बेस्ट उपक्रमातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे 292 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी 100 केव्हीए क्षमतेचे दोन जनरेटर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे, 500 केव्हीए क्षमतेचा एक जनरेटर ओम अपार्टमेंट उपकेंद्र येथे, 250 केव्हीए क्षमतेचा एक जनरेटर कॅडेल रोड उपक्रेंद येथे ठेवण्यात आला आहे.

दरवर्षी विविध प्रकारच्या सेवा बेस्ट प्रशासन पुरवत असते. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान परिसरातील महापालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थाच्या मंडपांना तात्पुरती मीटरजोडणी धर्मादाय वीजदराने पुरवण्यासाठी मैदानात एक खिडकी योजनाही उभारण्यात आली आहे. 5 डिसेंबरला रात्री 8.30 ते मध्यरात्री पर्यंत बसमार्ग 241, 351 व 354 जादा बसगाड्या चालवण्यात येतील. 6 डिसेंबरला बसमार्ग 27, 28,79, 85, 165, 241, 305, 351, 354,357, 385, 440 मर्यादित आणि 521 मर्यादित या बसमार्गावर एकूण 40 बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Intro:

मुंबई -   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोयीसुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने सुसज्ज व्यवस्था केली आहे. जादा बससेवांप्रमाणेच वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा बेस्टने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासोबतच यंदा बेस्ट उपक्रमामार्फत अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं मोफत देण्यात येणार आहेत. तसेच 40 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

   Body:यात जाती व्यवस्थेचे निर्मूलन, पत्रकारिता, बहीष्कृत भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यासाठी

1 लाख रुपयांची तरतूद  बेस्ट उपक्रमाने केली आहे. दादर स्थानक पश्चिमेकडून शिवाजी पार्क व चैत्यभूमीकडे जाण्यासाठी दादर फेरी या नावाने 5 व 6 डिसेंबर रोजी 24 तास बस गाड्या चालवण्यात येतील. 7 डिसेंबरला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अतिरिक्त जादा बसफेऱ्या चालवण्यात येतील. 

  बेस्ट उपक्रमातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे 292 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी 100 केव्हीए क्षमतेचे दोन जनरेटर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे, 500 केव्हीए क्षमतेचा एक जनरेटर ओम अपार्टमेंट उपकेंद्र येथे, 250 केव्हीए क्षमतेचा एक जनरेटर कॅडेल रोड उपक्रेंद येथे ठेवण्यात आला आहे.

 दरवर्षी विविध प्रकारच्या सेवा बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी बेस्ट प्रशासन पुरवित असते. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान परिसरातील महापालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थाच्या मंडपांना तात्पुरती मीटरजोडणी धर्मादाय वीजदराने पुरवण्यासाठी मैदानात एक खिडकी योजना उभारली आहे. 

5 डिसेंबरला रात्री 8.30 ते मध्यरात्री पर्यंत बसमार्ग 241, 351 व 354 जादा बसगाड्या चालवण्यात येतील. 6 डिसेंबरला बसमार्ग 27, 28,79, 85,165,241,305,351,354,357,385,440मर्यादित आणि 521 मर्यादित या बसमार्गावर एकूण 40 बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत.

बाईट - मनोज वर्दे, बेस्ट जनसंपर्क अधिकारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.