नवी दिल्ली SA20 Auction Live Streaming : IPL च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून T20 लीग सुरु झाली. IPL च्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.
𝙏𝙃𝙀 𝘾𝙊𝙐𝙉𝙏𝘿𝙊𝙒𝙉 𝙃𝘼𝙎 𝘽𝙀𝙂𝙐𝙉...💯#BetwaySA20 Season 3 incoming 😁 pic.twitter.com/WsjPR4pHFJ
— Betway SA20 (@SA20_League) October 1, 2024
लिलावासाठी 200 खेळाडूंची निवड : ही SA20 लीग क्रिकेट दक्षिण आफ्रिकेद्वारे आयोजित केली जाते. या लीगचे दोन हंगाम झाले आहेत आणि दोन्ही वेळा एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केपनं विजेतेपद पटकावलं आहे. आता SA20 लीगचा 2025 च्या हंगामासाठी लिलाव आज मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. जिथं सर्व संघांना आपल्या संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश करायला आवडेल. लिलावासाठी सुमारे 200 खेळाडू निवडले गेले आहेत. त्यापैकी 115 दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे सर्व संघ मिळून केवळ 13 खेळाडू खरेदी करु शकतात.
1️⃣ 𝗗𝗔𝗬 𝐓𝐎 𝐆𝐎‼
— Betway SA20 (@SA20_League) September 30, 2024
The Season 3 #BetwaySA20Auction is on your doorstep🔨
📅 1 October 2024
📺 Live here ➡️ https://t.co/33m4ognNsJ pic.twitter.com/ICs4WX4eIu
SA20 च्या 2025 हंगामात 6 संघ सहभागी : SA20 च्या 2025 लीगमध्ये 6 संघ खेळताना दिसतील. यात डर्बन सुपर जायंट्स, जॉबर्ग सुपर किंग्स, एमआय केप टाऊन, प्रिटोरिया कॅपिटल्स, सनरायझर्स इस्टर्न केप, पर्ल रॉयल्स यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग आणि UAE मध्ये ILT20 लीग होणार आहे. शमर जोसेफ, नसीम शाह, जोश लिटल, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल, कामेंदू मेंडिस, अफगाणचा फिरकी गोलंदाज कैस अहमद या दिग्गज खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आलं आहे. जॉबर्ग सुपर किंग्स ने रिझा हेंड्रीक्सला रिलीज केलं. तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. लिलावात सर्व संघांच्या नजरा त्याच्यावर असतील.
The #BetwaySA20Auction 𝙡𝙤𝙬𝙙𝙤𝙬𝙣 👌
— Betway SA20 (@SA20_League) September 30, 2024
Read all about it 🔗 https://t.co/90MydT0Pbf pic.twitter.com/gDnkH1yo1W
पर्ल रॉयल्स संघानं दिनेश कार्तिकची केली निवड : सर्व संघांना त्यांच्या संघात 19 खेळाडू असू शकतात, त्यापैकी किमान 10 दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू असले पाहिजेत. पर्ल रॉयल्स संघानं भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची वाईल्ड कार्डद्वारे निवड केली आहे. कार्तिकनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. SA20 लीगमध्ये खेळताना दिसणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू असेल.
लीलावाचं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पाहणार : टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर भारतात SA20 चा 2025 हंगामाचा लिलाव थेट पाहू शकता. याशिवाय, तुम्ही Jio Cinema ॲपवर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. हा लिलाव भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:45 ला सुरु होणार आहे.
हेही वाचा :