ETV Bharat / state

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद - काँग्रेस अध्यक्षपदावरुन मतभेद बातमी

राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व विरोधात एक दुफळी तयार झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये मोठे मतभेद असल्याचे दिसत आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नावालाच जास्त पसंती असल्याचे दिसत आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Aug 24, 2020, 3:43 PM IST

मुंबई - राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील 23 नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष नेतृत्वाचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात आता दिल्लीत बैठक सुरू आहे. काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांची राहुल गांधी हेच अध्यक्ष व्हावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, काहींनी सोनिया गांधींनीच अध्यक्षपद सांभाळावे अशी मागणी केली आहे. तर काहींनी पक्षात सामूहिक नेतृत्वाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

आज दिल्लीत होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरून मतभेद झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रविवारी (23 ऑगस्ट) राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी एक ट्विट करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना सोनिया गांधी यांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. तर मंत्री यशोमती ठाकूर यांनी ठामपणे राहुल गांधी यांच्या नावावर आपले समर्थन दर्शविले.

15 ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीला पक्षातील अस्वस्थतेला जोडले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राजी करावे. ते तयार होत नसतील, तर पक्षात सामूहिक नेतृत्वाची व्यवस्था करावी. राहुल गांधी यांचा पक्ष निर्णयातील हस्तक्षेप वाढल्याचे आरोप अनेकांनी केले आहेत. त्यामुळे एकत त्यांना अध्यक्षपद द्या अन्यथा दुसऱ्या कोणाला तरी करा, अशी मागमी जोर धरत असतानाच महाराष्ट्रातही अध्यक्षपदावरुन दुफळी निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री व कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी राहुल गांधी यांची गरज केवळ पक्षाला नसून संपूर्ण देशाला आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचे पारडे जड असल्याचे यावरुन दिसते.

हेही वाचा - राहुल गांधी यांच्याच नावाचा विचार झाला तरच काँग्रेस वाचेल- संजय निरुपम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.