मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी ते ३८ हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण केले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजनेतून मोदींच्या हस्ते 1 लाख फेरीवल्याना कर्ज दिले जाणार असे सांगण्यात आले होते. यासाठी मुंबईभरातून फेरीवाले यांना बीकेसी येथील सभेसाठी बोलवण्यात आले होते. यामुळे जवळपास ५०० फेरीवाले बिकेसी मैदानात आले होते. मात्र अस असताना काही फेरीवल्यांना आपण का आलोय हेच माहीत नव्हते. तर केवळ पालिका अधिकाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून मोदींच्या सभेत सहभागी व्हा असे सांगितले म्हणून आलो आहे, बाकी पैसे मिळणार की नाही हे सांगितले नाही असे म्हणाले आहेत.
संध्याकाळी बोलवायला हवे होते : संध्याकाळच्या सभेसाठी आम्हाला दुपारी १२ वाजेपासून मैदानाच्या येथे जमा राहण्यास सांगितले. पण इथे आल्यावर आपण आमची काही व्यवस्था करण्यात आलेली नाही. आम्हाला साधे पाणीही देण्यात आलेले नाही. आम्ही दुपारपासून काही खायला मिळालेले नाही. जर कार्यक्रम संध्याकाळी आहे तर आम्हाला संध्याकाळी बोलवायला हवे होते. कमीत कमी आम्ही आमच्या घरून जेवून तरी आलो असतो अशी खंत फेरीवाले राजेंद्र किसन देशमुख यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मोठी नाराजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणातून स्वनिधी योजना कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले. या योजनेमुळे फेरीवाले, गरीब कुटुंबाला चांगला आधार मिळेल. त्यामुळे स्वनिधी योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी निवड करणाऱ्या फेरीवाल्यांनी डिजिटल देवाण घेवाण करण्यासाठी प्रशिक्षण मिळावे यासाठी 300 कॅम्प आयोजित करण्यात आले होते असा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून केला. तर ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळातच लागू करायला हवी होती. मात्र गरीब फेरीवाल्यांचे पैसे महाविकास आघाडी सरकारने रोखले असा टोला आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. या योजनेच्या माध्यमातून नियमांच्या अधिकागतपत्रांची पूर्तता करणाऱ्या फेरीवाल्याला सुरुवातीला दहा हजार रुपयांचा कर्ज मिळणार आहे. आणि त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तो फेरीवाला येऊ शकतो अशी ही महत्वपूर्ण योजना आहे. मात्र सभा सुरू होण्यापूर्वी ज्या फेरीवाल्यांना सभास्थळी आणण्यात आलो होतो. त्या सर्वांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : PM Modi In Mumbai डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास पंतप्रधान