ETV Bharat / state

Mumbai Crime: क्राईम पेट्रोल पाहून पुजाऱ्याच्या वेशात जैन मंदिरात चोरी करणारा आरोपी अटकेत

गुन्हेगारी मालिका क्राईम पेट्रोल पाहून गुन्हा करणाऱ्या एका आरोपीला दिंडोशी पोलीसांनी अटक केली आहे. तो जैन धर्मीयांच्या वेशात मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने जैन मंदिरात जात असे, मंदिरातील पुजाऱ्याचे सोन्याचे ताट चोरून पळून जात असे.

Mumbai Crime
क्राईम पेट्रोल पाहून गुन्हा करणाऱ्या आरोपीला अटक
author img

By

Published : Jan 30, 2023, 1:24 PM IST

Updated : Jan 30, 2023, 2:53 PM IST

क्राईम पेट्रोल पाहून गुन्हा करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई: पुजाऱ्याच्या वेशात येऊन आरोपी दररोज ५ जैन मंदिरांची रेकी करत होता. अखेर त्याने मालाड येथील एका जैन मंदिरात धार्मिक पोशाखात जाऊन सोन्याची वाटी आणि ताट लंपास केले. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 93 सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. भारत सुखराज दोशी (53, रा. रामचंद्र लेन, मालाड पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Mumbai Crime
जैन मंदिराची रेकी करताना आरोपी

अशी सुचली चोरीची कल्पना : गुन्हेगारी मालिका क्राईम पेट्रोल पाहून गुन्हा करणाऱ्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे, जो जैन धर्माच्या धार्मिक पोशाखात मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने जैन मंदिरात जात असे. मंदिरातील पुजाऱ्याचे सोन्याचे ताट व सोन्याचे ताट चोरून पळून गेला. क्राईम पेट्रोल पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी जैन समाजाचा पोशाख परिधान करून पूजेच्या बहाण्याने जैन मंदिरात रेकी केली होती. चेहऱ्यावर मास्क लावून सोन्याचा ऐवज नेत असल्याची कबुली आरोपीने दिली. तो चांदीच्या पूजेचे साहित्य देवळातून लंपास करून दुकानदाराला विकायचा. आरोपी मिळालेल्या पैशातून जुगार खेळायचा. दिंडोशी पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी जैन समाजाच्या धार्मिक पोशाखात येऊन दररोज 5 मंदिरांची रेकी करायचा आणि संधी मिळेल तिथे सामान चोरायचा. जैन पुजाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीची सोन्याची भांडी जप्त केली.

सीसीटीव्हीत कैद झाला आरोपी : मालाडच्या जैन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी जैन धर्माच्या वेशात मंदिरात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पूजा करण्यासोबतच रेकी करत आहे. आरोपीच्या हातात सोन्याचे ताट आणि वाटी आहे. संधी मिळताच तो सोन्याचा ताट घेऊन मंदिराबाहेर पडला. त्याच दुसऱ्या घटनेत आरोपी घरातून स्कूटरवरून उतरून पायी मंदिराच्या परिसरात पोहोचायचा आणि चोरी केल्यानंतर तो सीसीटीव्ही कॅमेरे नसलेले मार्ग निवडायचा.

पोलिसांकडून मंदिर परिसराची झडती : 23 जानेवारी रोजी जैन पुजारी धीरज लाल शहा यांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार दिली होती की, ते सकाळी 160 ग्रॅम सोन्याचे ताट घेऊन पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता तेथून त्यांचे सोन्याचे ताट गायब झाले आहे. या धक्कादायक चोरीप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक जीवन खरात यांच्या सूचनेवरून पोलिसांनी मिळून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची झडती घेतली. आरोपीने केलेल्या पोशाखामुळे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी 93 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. कारण जैन धर्मीय त्याच वेषात त्यांच्या मंदिरात म्हणजे देरासरमध्ये जातात. जैन समाजाच्या वेशात आरोपी पूजेच्या बहाण्याने जैन मंदिरात प्रवेश करतो आणि चोरी करून पळून जातो हे सीसीटीव्ही फुटेजवरूनच उघड झाले आहे.

आरोपी जुगाराचा शौकीन : सीसीटीव्ही फुटेजवरून असेही समोर आले आहे की, आरोपी वेशात दररोज 5 जैन मंदिरात जायचा आणि रेकी करून तेथून पूजेचे ताट आणि चांदीची भांडी चोरून विकत असे. किरकोळ चोरी असल्याने मंदिरातील लोकांनी कधीही चोरीची तक्रार दाखल केली नाही. भारत सुखराज दोशी (53, रा. रामचंद्र लेन, मालाड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो जुगार खेळण्याचा शौकीन होता. पोलिसांनी आरोपींकडून 160 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वस्तू आणि एक स्कूटर, असा एकूण 5 लाख 30 हजार रूपयांचा मुद्दे्माल जप्त केला आहे.

हेही वाचा: Girl Missing Complaint : धक्कादायक! 2022 मध्ये तब्बल 1164 मुली बेपत्ता, काही प्रकरणांमध्ये आढळले राजस्थान कनेक्शन

Last Updated : Jan 30, 2023, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.