मुंबई Mushtaq Khan : अभिनेता मुश्ताक खान यांनी नाटक आणि चित्रपटाचं महत्त्व स्पष्ट केलं. नाटक आणि विज्ञान यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्सवांचा फायदा होत आहे आणि पुढेही होणार आहे. यावेळी त्यांनी आपण केलेल्या चित्रपटांची माहिती, चित्रपटावेळी आलेल्या अनुभवांविषयीच्या गंमती-जमती सांगितल्या. तसंच यावेळी 'वेलकम' चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग मुलांपुढे सादर केला. तसंच यावेळी माजी न्यूक्लिअर सायंटिस्ट डॉ. ए. पी. जयरामन यांनी विज्ञानाचं महत्त्व विशद केलं. रोजच्या जीवनात विज्ञान कशा प्रकारे निगडित आहे याविषयी देखील मार्गदर्शन केलं.
नाटकाच्या माध्यमातून वैज्ञानिक संदेश : या विज्ञान नाट्य महोत्सवी संकल्पनांबाबत माहिती देताना शिक्षण अधिकारी यादव म्हणाल्या की, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय अंतर्गत, राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव सुरू करण्यात आला आहे. 26 सेंटर पूर्ण भारतभर कार्यरत असून प्रत्येक ठिकाणी ही विज्ञान नाट्य संकल्पना सुरू करण्यात आली आहे. नाटकाच्या माध्यमातून वैज्ञानिक संदेश देण्याच्या हेतूने अशाप्रकारे राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव सुरू करण्यात आला. 2001 पासून सुरू असलेल्या या उत्सवाला आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं आहे. देशातील पाच विभागातून 2 निवडक नाटके निवडली जातात. ही 10 निवडक नाटकं देशभरातून आलेली असतात. ही नाटकं राष्ट्रीय महोत्सवामध्ये सादर केली जातात.
10 नाटकांचे सादरीकरण : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी वापर हा मूळ विषय कायमच ठरलेला असतो. त्यानंतर त्याचे उपविषय ठरवले जातात. या वर्षी भरडधान्य, खाद्य सुरक्षा हा विषय आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, दिल्ली, ओडीशा, आसाम, बिहार आणि त्रिपुरा ही दहा राज्यं आपापल्या झोन मधून निवडून आली आहेत. राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात 10 नाटकांचं सादरीकरण झालं असून प्रेक्षकांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा: