ETV Bharat / state

धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटलांचा काँग्रेस पक्षात प्रवेश - sharad patil join congress news

धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटलांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

author img

By

Published : Jun 3, 2021, 10:01 PM IST

मुंबई - धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील आदी उपस्थित होते.

'उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता'
काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे नाना पटोले यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.

'नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरु'
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरु असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.