मुंबई - भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशनसह ५ सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनीही सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवलली आहे. विरोधकांनी ७० वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनीच देश विकायला काढला आहे. येणारी पुढची पिढी यांना कदापी माफ करणार नसल्याचे मुंडे म्हणाले.
आर्थिक मंदीचा फटका केंद्र सरकारच्या ताब्यात असणाऱ्या कंपन्यांनाही बसला आहे. भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशनसह ५ सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार आहे. सरकार या कंपन्यांमधील आपला हिस्सा विकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.