मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटीविना सरसकट २ लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी स्वागत केले आहे. इडा पिडा टळली... बळीचं राज्य आलं! अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय ही कर्जमाफी केली जाणार असून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याचे मुंडे म्हणाले.
-
इडा पिडा टळली... बळीचं राज्य आलं!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
महाराष्ट्र विकास आघाडीनं शेतकऱ्यांसाठी पहिलं आणि महत्वाचं पाऊल उचललं.माझ्या शेतकऱ्याला २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार.कोणत्याही जाचक अटीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन! #FarmerLoanWaiver pic.twitter.com/1uWn2dLs0j
">इडा पिडा टळली... बळीचं राज्य आलं!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2019
महाराष्ट्र विकास आघाडीनं शेतकऱ्यांसाठी पहिलं आणि महत्वाचं पाऊल उचललं.माझ्या शेतकऱ्याला २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार.कोणत्याही जाचक अटीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन! #FarmerLoanWaiver pic.twitter.com/1uWn2dLs0jइडा पिडा टळली... बळीचं राज्य आलं!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2019
महाराष्ट्र विकास आघाडीनं शेतकऱ्यांसाठी पहिलं आणि महत्वाचं पाऊल उचललं.माझ्या शेतकऱ्याला २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार.कोणत्याही जाचक अटीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन! #FarmerLoanWaiver pic.twitter.com/1uWn2dLs0j
१६ डिसेंबरपासून सुरु असणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आज शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीचा समाधानकारक निर्णय झाला. मात्र, विरोधकांनी यावर टीका केली आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या सरकारने २ लाखांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका करत विरोधकांनी सभात्याग केला.