ETV Bharat / state

कोरोना चाचण्यांसाठी आरटी-पीसीआर टेस्टवर अधिक भर द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - कोरोना चाचण्या मुंबई बातमी

कोरोना रुग्णांची संख्या पाहता अँटीजेन चाचण्यांऐवजी आरटी-पीसीआरवरच अधिक भर द्यावा. तसे निर्देश संबंधितांना द्यावेत, तसेच मुंबईत केल्या जाणार्‍या अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या स्वतंत्रपणे दररोज जाहीर करण्यात यावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
author img

By

Published : Jul 29, 2020, 9:16 PM IST

मुंबई : कोरोना चाचण्यांची संख्या वाढवत असताना आरटी-पीसीआर चाचण्यांवरच अधिक भर द्यावा. उपलब्ध क्षमतेतून या चाचण्या केल्यास जनतेला आर्थिक भूर्दंड पडणार नाही आणि अधिक अचूक निदान होईल. अशाप्रकारच्या चाचण्यांची क्षमता असताना सुद्धा ती उपयोगात आणली जात नाही. त्याकडे लक्ष देण्याची विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, मुंबईचा अँटीजेन चाचण्यांचा अनुभव फारसा चांगला नाही. 18 ते 21 जुलै या काळात मुंबईत दोन प्रयोगशाळांचे अहवाल लक्षात घेता, लक्षणे असलेल्या सुमारे 65 टक्के रुग्णांची अँटीजेन चाचणी ही कोविड-19 साठी नकारात्मक आली होती. पण, त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह आले. तामिळनाडूने असाच प्रारंभीच्या काळात अँटीजेन चाचण्यांवर भर दिल्या. त्यामुळे त्यांच्या चाचण्या वाढलेल्या दिसल्या. पण, नंतरच्या काळात त्यांनी केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देणे सुरू केले. अँटीजेन चाचण्यांमध्ये ‘फॉल्स निगेटिव्ह’ची संख्या भरपूर असल्याने त्यांना आपल्या टेस्टिंग योजनांमध्ये बदल करावा लागला होता.

अ.भा. आयुर्विज्ञान अनुसंधान संस्थानने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता मोठी आहे. शासकीय प्रयोगशाळांमध्ये 35 हजार 900 तर खाजगी प्रयोगशाळांमध्ये 20 हजार 40 इतकी प्रतिदिन क्षमता आहे. एकूण चाचण्यांची क्षमता 55 हजार 940 इतकी आहे. यातील 12 हजार 210 इतकी क्षमता एकट्या मुंबईत उपलब्ध आहे. आतापर्यंतची मुंबईतील चाचण्यांची सरासरी पाहिली, तर ती साधारणत: 5 हजार 800 चाचण्या इतकी आहे. प्रत्यक्षात 12 हजार 210 ही क्षमता असताना त्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात ती वापरली जाते आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:च्या खिशातून चाचण्यांसाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. स्थानिक प्रशासनालासुद्धा पर्यायी चाचण्यांवर अतिरिक्त निधी खर्च करावा लागतो आहे. तीच क्षमता पूर्णपणे वापरल्यास नागरिकांना नाहक भूर्दंडही पडणार नाही, त्यांच्या मोफत चाचण्या होतील आणि त्या अधिक संख्येने अचूक होतील. त्यामुळे अँटीजेन चाचण्यांऐवजी आरटी-पीसीआरवरच अधिक भर द्यावा. तसे निर्देश संबंधितांना द्यावेत, तसेच मुंबईत केल्या जाणार्‍या अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या स्वतंत्रपणे दररोज जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.