ETV Bharat / state

सत्ता समीकरण बदलले, अजित पवारांचे बंड की शरद पवारांचा गेम?

आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतल असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सत्ता समीकरण बदलले
author img

By

Published : Nov 23, 2019, 10:11 AM IST

मुंबई - राज्यातले दैनंदिन व्यवहार सुरु असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीने अचानक भाजपला पाठिंबा देत सत्तास्थापन केली. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयामागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे, की अजित पवार यांचे बंड या चर्चेला उधाण आलं आहे.

विजय गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई

आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या निर्णयाबाबत अंधारात असल्याचंही दिसत आहे. सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते आहेत. त्यामुळे थेट अजित पवार यांनीही पाठिंबा दिला असावा, अशी चर्चा आहे. यावर शरद पवारांनी अजित पवारांच्या या पाठिंब्याला सहमती नसल्याचे सांगितले आहे.

Intro:mh_rajbhavan_satta_mumbai_704684

Body:सत्ता समीकरण बदलले
मुंबई:
राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला असून आज सकाळीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवर जाऊन शपथ घेतली. सोबत राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार होते .या संदर्भात गेल्या दोन दिवसांमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी झाल्या परवा रात्री दीड वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेटले होते. तद्वतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती यादरम्यान महा विकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या.परंतु कोणताही अंतिम निर्णय झाला नसताना आज सकाळी अचानक राजभवन म्हणून राष्ट्रपती राजवट उठवण्याचे घोषणा करण्यात आली .आणि तद्वतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्यांमध्ये एक मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आता शिवसेना आणि काँग्रेस कडून या राजकीय घडामोडी कुठलं प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.